google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

महापरिनिर्वाण दिनासाठी अनुयायांच्या सोयी- सुविधांचे काटेकोर नियोजन करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश..

विविध यंत्रणांकडून तयारीचा आढावा सादर मुंबई, दि. २९ :- ‘महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे,’ असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ […]

“गाव तिथे साखळी उपोषण”काटेकोर अंमलबजावणी करा.

नाशिकच्या सकल मराठा समाजाचे आवाहन. नाशिक :- मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानंतर आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात येत्या १ डिसेंम्बरपासून महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मराठा आरक्षनाच्या लढ्यात “गाव तिथे मराठा आरक्षण” यासंदर्भात नाशिकच्या सकल मराठा समाजवतीने शिवतीर्थावर नाशिक जिल्ह्यातील गावागावात जाऊन मराठा साखळी उपोषणाबाबत व्यापक जनजागृती करण्याबाबत भूमिका ठरवण्यात आली.गावागावात मराठा साखळी उपोषणाबद्दलमराठा आरक्षणाच्या दृष्टीने शांततामय आंदोलने […]

आधी शेतकरी हित नंतर आमदार, पक्ष बाळासाहेब थोरात..

देशाच्या कॅलिफोर्निया असलेल्या निफाड तालुक्यात अवकाळी पावसाने गारपिटीस वादळ वाऱ्याने भुईसपाट करत निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक म्हणा की कांदा, भाजीपाला, ऊस, टोमॅटो ,अशी सर्व पिके उध्वस्त झाल्याने या पिडीत बळीराजाला म्हणा शेतकऱ्याला मायेचा आधार देण्यासाठी विधानसभा सभागृहातील काँग्रेस विधिमंडळ नेते तथा राज्याचे माजी महसूल व कृषि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे, […]

राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाने अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित..

मुंबई, दि. 29 : गेल्या दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व […]

अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा

मुंबई, दि. २९ : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्दरितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री […]