google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

छत्रपती शाहू महाराज जयंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने पेढे वाटून साजरी

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाक्याबरोबरच छत्रपती शाहू महाराजांचे अतुलनीय आणि मौल्यवान कार्य-विचार स्मरून आपण छत्रपती शाहू महाराज जयंतीचे आयोजन करन्याय आले .
जाणूनबुजून दुर्लक्षित ठेवण्यात आलेल्या या आपल्या हक्काच्या राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे देशहितकारक, सत्यशोधक विचार कार्य तळागाळात पोहोचावे, आपल्या वर्तमान आणि भविष्यातील पिढीला ते प्रेरक, मार्गदर्शक ठरावे, त्यातूनच सुजलाम, सुफलाम, संघटीत, लोककल्याणकारी देश घडावा हा प्रामाणिक हेतू आहे.उदोजी मराठा बोर्डिंग (मवीप्र)गंगापूर रोड येथील पूर्णकृती पुतळ्या समोर हा देखणा सोहळा पार पडला
आजच्या कार्यक्रमावेळी जयंती निमित्त पेढे वाटप करून सण साजरा करण्यात आला नाशिकच्या कुस्तीला वैभव प्राप्त करून देणाऱ्या जुन्या पैलवानांचा सन्मान करण्यात आला या मध्ये प्रामुख्याने दांडेकर दीक्षित तालीम संघांचे पै.हिरामण नाना वाघ पै.लक्ष्मण भास्कर पै.दीपक देवकर छपरीच्या तालमितील पै.शरद प्रभाने मोहन मास्तर तालीम संघांचे पै.दत्तू पाटील यांचा सन्मान करण्यात आला व त्याचबरोबर श्रीराम मर्दानी खेळाचा आखाडाचे सर्वेसर्वा आनंदजी ठाकूर यांनी एक रुपया देखील न घेता मर्दानी खेळाचे प्रत्यक्षिके सादर केली त्यांचा देखील सन्मान ब्रिगेडच्या वतीने घेण्यात आला
आज शाहू महाराज जयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने जयंती निमित्त आपापल्या घरी गोड धोड करून खावे हा आंनदोत्सव साजरा करावा
या कार्यक्रमावेळी संभाजी ब्रिगेडचे विक्रम गायधणी व वैभव गायधणी यांनी देखील लाठ्या काठ्या बानाट्या फिरवून उपस्थितांना टाळ्या वाजवण्यास भाग पाडले व सर्वांनी त्यांचे कौतुक केले कार्यक्रमांचे प्रास्थाविक व आभार महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित
जिल्हाप्रमुख शरद लभडे,नितीन रोठे पाटील,सहकारी मित्र नाना निकम,अनिलजी आहेर,
प्रफुल्ल वाघ,विकी गायधनी,मंदार धिवरे,हर्षल पवार,नितीन काळे,वैभव गायधनी,प्रेम भालेराव,सौरभ पवार,गणेश पाटील व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *