google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

चितेगाव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता नववी उर्दू वर्गाला मान्यता.

अमर अक्रम सय्यद यांच्या प्रयत्नांना यश छत्रपती संभाजीनगरवृत्त :- पैठण तालुक्यातील चितेगाव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता उर्दू पहिली ते आठवी पर्यंत होती. परंतु चितेगावातील केंद्रीय प्राथमिक शाळेत उर्दू मुलींची संख्या जास्त असून सुद्धा नववी , दहावी वर्ग करीता मान्यता देण्यात येत नव्हती तरी जिल्हा परिषद छा संभाजीनगर येथे मागील चार वर्षापासून मान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा करून […]

नाशकात छात्रभारती संघटनेच्या वतीने ‘चला करिअर वर बोलू काही’ संवाद सोहळा संपन्न

नाशिक वृत्त :- दहावी, बारावी हे दोन वर्षे हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात. यावरच विद्यार्थ्यांच्या पुढील करिअर ची दिशा ठरत असते म्हणूनच जीवाची बाजी लावत वर्षभर विद्यार्थी अभ्यास करून या परीक्षेत प्राविण्य मिळवतात. परंतु यापुढे आपण नेमकं काय करावं हा प्रश्न नेहमी या विद्यार्थ्यांसमोर असतो. या उद्देशान विज्ञान युगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना म्हणून ओळख […]

चॅम्पियन इंडियन

क्रिकेट या खेळाला जन्मजरी इंग्लंडने दिला असला तरी क्रिकेट हे वाढलं मोठं झालं ते या भारत देशातच हे कोणीही नाकारू शकणार नाही. टी 20 वर्ल्डकप फायनल आपण खेळणार होतोच कारण संपूर्ण बॅलन्स टीम घेऊन रोहित कॅप्टन्सी करत होता.आपण पूर्ण टूर्नामेंट चांगली खेळलो प्रत्येकाचा परफॉर्मन्स योग्य वेळी कामी आला( उदा: याच मॅचचा प्लेएर ऑफ दि मॅच […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान पुणे :- टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी….  ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर […]

आळंदी येथे तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे :- आळंदी नगरपालिका निधीतून उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, नगरपरिषदचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी संस्थानचे पदाधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटनही करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते […]

सुरेश कुटे यांच्या सर्व प्रॉपर्टी जप्त करून ठेवीदारांचे पैसे द्या-आ.राजेश टोपे

जालना :- राज्याचे माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रिडिट सोसायटी लि,बीड यांच्या राज्यात जवळपास 100 च्या वर शाखा असून हजारो कोटीच्या दरम्यान ठेवी आहेत.सोसायटीने आकर्षक व्याजदर दिल्यामुळे गोरगरीब लोकांनी काबाड कष्ट करून रोजंदारी करून पन्नास हजार,एक लाख रुपये अशा खूप मोठ्या पद्धतीनं ठेवी ठेवल्या आहेत. मोठ्या धनिकांच्या […]

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले. यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी […]

‘नीट’ परीक्षा पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त होण्यासंदर्भातील विरोधी व सत्ताधारी पक्षांच्या सूचनांचा सकारात्मक विचार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील; केंद्राकडून अध्यादेश जारी होण्यासह दोषींविरुद्ध कठोर कारवाईस सुरुवात मुंबई, दि. 29 :- “वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाच्या ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची केंद्र आणि राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून वेगवेगळ्या यंत्रणांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. दोषींना अटक करण्यात आली आहे. भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश […]

महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक २८: राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्वल करणारा आहे. महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. हा महाराष्ट्राच्या विकासाचा गजर करणारा […]

६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांच्या तरतूदीचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर

अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय; शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ मुंबई, :- दि. २८ : महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार […]