स्मशानभूमीतील केली जात होती अघोरी पूजा काय आहे प्रकरण…

author
0 minutes, 0 seconds Read

अघोरी पूजेचे साहित्य जमा करून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केले लोकप्रबोधन

नाशिक:- दिंडोरी तालुक्यातील वलखेड या गावातील स्मशानभूमीत मागील चारपाच दिवसांपूर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुदतीत दुश्मनाचा मृत्यू व्हावा यासाठी स्मशानभूमीत कणकेची बाहुली , लिंबू, टाचण्या, कुंकू , कवड्या, लाल धागा हे एका टोपलीत ठेवून मृतदेहाला ज्या ठिकाणी अग्नीडाग देतात त्याच ठिकाणी केल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले.

त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात भीती पसरल्याचे जाणवले. काही नागरिकांनी गावचे सरपंच विनायक शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ .ठकसेन गोराणे यांनी पत्रकार संतोष विधाते यांच्याशी संपर्क करून वस्तुस्थिती जाणून घेतली.प्रत्यक्ष वलखेडला जाऊन सदर अघोरी पूजेची शहानिशा करून लोक प्रबोधन करण्याचेही अंनिसच्या कार्यकर्त्यांनी निश्चित केले.त्याप्रमाणे आज दुपारी डॉ. ठकसेन गोराणे,जिल्हा बुवाबाजी विरोधी संघाचे सचिव महेंद्र दातरंगे ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष संतोष कथार,कार्यध्यक्ष संतोष विधाते,सरचिटणीस संदीप गुंजाळ,सदस्य अमोल जाधव,आनंदा शिंगाडे आदींनी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना भेटून घडलेला अघोरी पूजेचा प्रकार त्यांनी पोलीस निरीक्षकांना कथन केला. सरपंच विनायक शिंदे यांनी याबाबत पोलिसांना तक्रार अर्ज दिला.

या अंधश्रद्धेच्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले. त्यानंतर सरपंच शिंदे यांच्यासह अंनिसचे कार्यकर्ते प्रत्यक्ष वलखेड गावातील स्मशानभूमीत पोहोचून तेथील आणखी दुसऱ्या ठिकाणी अघोरी पूजेच्या साहित्यात बिडी बंडल, काडेपेटी, गांजाची पुडी, चिलीम, कोहळा, काळी बाहुली, अंडे, टाचण्या असेही साहित्य कार्यकर्त्यांना सापडले.त्यातील तथाकथित करणीचे नारळ फोडून त्याचे पाणी कार्यकर्त्यांनी सर्वांसमोर प्राशन करून अशा प्रकारे जादूटोणा, करणी, भानामती ,काळी जादू असे काही नसते,हे कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाने करून दाखवून, उपस्थित महिला व पुरुषांचे प्रबोधन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जमा केलेले अघोरी पूजेचे सर्व साहित्य पुन्हा दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *