google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची दोन वर्षाच्या मुलासह आत्महत्या…

author
0 minutes, 0 seconds Read

निफाड तालुक्यातील सोनेवाडी बु येथील विवाहितेने आपल्या मुलासह शेततळ्यात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुजाता भूषण निचित (२६) व गुरु भूषण निचित (२) असे आत्महत्या केलेल्या मायलेकाची नावे आहेत. या विवाहितेने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याची अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

तसेच मायलेकांनी आत्महत्या केल्याची घटना समजताच चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी दाखल होत शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढले. यानंतर पुढील उत्तरीय तपासणीसाठी निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तपासणी केल्यानंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, मयत विवाहितेचे माहेर हे निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील असून सासरच्या मंडळींनी घातपात केलाच्या आरोप माहेरच्यांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणी सासरच्यांविरोधात निफाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *