नाशिक :- नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखा युनिट-२ ने कार्यवाही करत एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. गुरनं. ३७४/२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (२) ३३१ (३) अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना, संशयित अजय गुरमितसिंग गुप्ता याला ताब्यात घेतले. वरिष्ठ […]
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर शाळांना १८, १९ व २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भात आदेश जारी केले आहेत. शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, शिक्षकांना निवडणूक कार्यात सहभागी होण्यामुळे काही ठिकाणी शाळा भरवणे शक्य होणार नाही. त्यामुळे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना या कालावधीत शाळा […]
नाशिक : – श्री बागेश्वर धाम महाराज (श्री बागेश्वरधामचे पिठाधीश्वर परमपूज्य श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी) गुरुवारी नाशिक पुण्यनगरीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या पावन उपस्थितीत श्री बागेश्वरधाम सेवा समितीने एकदिवसीय “संत सभा” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता तपोवन येथील मोदी मैदानावर संपन्न होणार आहे. समितीकडून कार्यक्रमासाठी जय्यत तयारी […]
नाशिक :- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार आ. सीमा महेश हिरे यांच्या विजयाचा निर्धार सातपूर, गंगापूर आणि शिवाजीनगर परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी प्रचार रॅलीतून व्यक्त केला आहे. रविवारच्या या रॅलीत प्रभाग क्रमांक १० व ११ मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सीमा हिरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा संकल्प केला. खान्देश मराठा मंडळाचे सातपूर अध्यक्ष राजू […]
नाशिक :- नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील जेल रोड भागात नागरिकांना सातत्याने संपर्कात राहणारा ओळखीचा आणि आश्वासक चेहरा हवा आहे, आणि महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले याच्यात तो चेहरा पाहत आहेत, असा दावा ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव यांनी केला आहे. जेल रोडच्या प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांत ॲड. ढिकले यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीत आढाव यांनी […]
लातूर जिल्ह्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ. सागरबाई बाबुराव सगर ठरले मानाचे वारकरीपंढरपूर : वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय […]
नाशिक :- आगामी २० नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य, पश्चिम, पूर्व आणि इगतपुरी मतदारसंघांमध्ये मतदान यंत्रांसाठी ‘स्ट्राँगरूम’ सज्ज करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे, ज्यामध्ये सीआरपीएफ, एसआरपी आणि स्थानिक पोलिसांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिकमध्ये प्रत्येक स्ट्राँगरूमवर विशेष निरीक्षण तैनात […]
नाशिक (प्रतिनिधी) रविवारची संध्याकाळ मतदारांच्या भेटीगाठीने दुमदुमली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा.सौ. देवयानी फरांदे यांनी पदयात्रा काढून मतदारसंघातील बंधू भगिनी व युवा नवमतदारांची भेट घेतली. यावेळी प्रभाग १३ मध्ये भाजपा – महायुतीच्या कमळ निशाणीला भरघोस मतदान करण्याचा संकल्प असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले. उत्स्फूर्तपणे स्वागत करुन भरघोस प्रतिसाद दिला. मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन […]
साकूर (ता. पारनेर) – सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी साकूर येथील बसस्थानकाजवळ कान्हा ज्वेलर्समध्ये पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून तब्बल ५०० ते ६०० ग्रॅम सोने आणि रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली. अंदाजे कोट्यवधी रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर दुचाकीवरून पारनेरच्या दिशेने पळाले. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना […]
नाशिक: विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी सकल मराठा परिवार या सामाजिक संघटनेने मतदान जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. निवडणुकीत योग्य उमेदवार निवडण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी विविध मार्गांनी प्रबोधन करण्यात येत आहे. सकल मराठा परिवाराच्या वतीने नाशिकमध्ये शाळांच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जनजागृती रॅली, पथनाट्य, पोस्टर्स, […]