नाशिक :- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार आ. सीमा महेश हिरे यांच्या विजयाचा निर्धार सातपूर, गंगापूर आणि शिवाजीनगर परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी प्रचार रॅलीतून व्यक्त केला आहे. रविवारच्या या रॅलीत प्रभाग क्रमांक १० व ११ मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सीमा हिरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा संकल्प केला. खान्देश मराठा मंडळाचे सातपूर अध्यक्ष राजू […]
नाशिक :- नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील जेल रोड भागात नागरिकांना सातत्याने संपर्कात राहणारा ओळखीचा आणि आश्वासक चेहरा हवा आहे, आणि महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले याच्यात तो चेहरा पाहत आहेत, असा दावा ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव यांनी केला आहे. जेल रोडच्या प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांत ॲड. ढिकले यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीत आढाव यांनी […]
नाशिक :- आगामी २० नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य, पश्चिम, पूर्व आणि इगतपुरी मतदारसंघांमध्ये मतदान यंत्रांसाठी ‘स्ट्राँगरूम’ सज्ज करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे, ज्यामध्ये सीआरपीएफ, एसआरपी आणि स्थानिक पोलिसांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिकमध्ये प्रत्येक स्ट्राँगरूमवर विशेष निरीक्षण तैनात […]
नाशिक (प्रतिनिधी) रविवारची संध्याकाळ मतदारांच्या भेटीगाठीने दुमदुमली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा.सौ. देवयानी फरांदे यांनी पदयात्रा काढून मतदारसंघातील बंधू भगिनी व युवा नवमतदारांची भेट घेतली. यावेळी प्रभाग १३ मध्ये भाजपा – महायुतीच्या कमळ निशाणीला भरघोस मतदान करण्याचा संकल्प असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले. उत्स्फूर्तपणे स्वागत करुन भरघोस प्रतिसाद दिला. मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन […]
नाशिक: विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी सकल मराठा परिवार या सामाजिक संघटनेने मतदान जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. निवडणुकीत योग्य उमेदवार निवडण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी विविध मार्गांनी प्रबोधन करण्यात येत आहे. सकल मराठा परिवाराच्या वतीने नाशिकमध्ये शाळांच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जनजागृती रॅली, पथनाट्य, पोस्टर्स, […]
दिंडोरी: दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचाराला शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले व सहकार नेते सुरेश डोखळे यांनी उत्स्फूर्त समर्थन दिल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम आणि पूर्व भागात एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवण्याचा निर्धार जुन्या व नव्या शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे, तर शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रवादीच्या […]
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 कडून वाहनासह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये असल्याची माहिती कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक एस.एम. मस्करे […]
नाशिक: नाशिक जिल्हा महिला काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्षा वंदना पंडित पाटील यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या विविध योजना आणि संकल्पांची माहिती दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सहकार्याने 2024 विधानसभा निवडणुकांसाठी या महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या योजनांमध्ये महिलांसाठी वर्षाला 6 मोफत गॅस सिलेंडर, मोफत प्रवास, […]
आडगावमध्ये महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रचारासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले, ज्यात स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी भूसंपादनात स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली. त्यांनी ठाम शब्दात सांगितले की, स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील आरक्षण न घेता बाहेरील धनाढ्य लोकांना प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना नडणाऱ्यांना आडगावकर जागा दाखवतील. आडगावातील मारुती मंदिरापासून या रॅलीची सुरुवात […]
नाशिक :- नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारार्थ तुपसाखरे लॉन्स येथे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात राऊत यांनी नाशिकसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांनी या निवडणुकीला महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महत्त्वपूर्ण ठरवत नाशिकमध्ये भगवा झेंडा फडकत राहावा, असे मत व्यक्त केले. यावेळी […]