राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातूनही महत्त्वाच्या निकालांचे चित्र स्पष्ट होत आहे. येवला मतदारसंघात छगन भुजबळ पिछाडीवर येवला मतदारसंघात महायुतीतील मंत्री छगन भुजबळ यांना तगडा लढा मिळत असून दुसऱ्या फेरीच्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे १,३०० मतांनी आघाडीवर आहेत. मालेगाव […]
नाशिक: महाराष्ट्रातील २० नोव्हेंबरला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज, २३ नोव्हेंबरला जाहीर होत आहेत. पोस्टल मतमोजणीच्या प्रारंभिक फेऱ्यांमध्ये काही संकेत मिळत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष महायुती आणि महाविकास आघाडीच्या लढतीवर केंद्रित आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट सतर्क मोडवर आहेत. फूट टाळण्यासाठी गटांचे पाऊल पक्षांतर्गत फूट आणि संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी […]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला आघाडीचा कौल मिळाल्याचे दिसत असले तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंतून सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचा निर्धार महाविकास आघाडीने बहुमत मिळाल्यास २६ नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा ठराव करण्यात […]
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागांचे स्पष्ट बहुमत मिळेल आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. महाविकास आघाडीचा विश्वास संजय राऊत म्हणाले की, “राज्यभरात ६५% हून अधिक मतदानाची […]
नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) सरासरी ६९.१२% मतदानाची नोंद झाली. काही किरकोळ वाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात मतदान सुरळीत पार पडले. शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. मतदानाचा शेवटचा टप्पा पार झाल्यानंतरही काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. प्रमुख विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी महत्त्वाचे मुद्दे व […]
नाशिक :- सकल मराठा समाजाने नाशिक येथे झालेल्या बैठकीत एकमुखी निर्णय घेतला की, समाजाचा कोणत्याही गटाला किंवा उमेदवाराला ठरलेला पाठिंबा नाही. समाज सर्वसमावेशक आणि एकसंध आहे. त्यामुळे प्रत्येकाला समाजाच्या हिताचा उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, असे स्पष्ट करण्यात आले. सकल मराठा समाजाचे नेते नाना बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काल-परवा काही गटांनी व्यक्त केलेल्या पाठिंब्याला […]
विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार सहभागी आहेत. किती तरी आमदारांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ तर काही उमेदवारांची ही दुसरी, तिसरी, चौथी वेळ असणार आहे. […]
नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणावर तीव्र शब्दांत टीका करत, यामुळे राज्याचा विकास थांबल्याचा आरोप केला. सातपूर येथे मनसे उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी जातीयवाद आणि स्वार्थी राजकारणाचा भडिमार करत, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनसेला संधी देण्याचे आवाहन केले. राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणामुळे मूळ […]
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रचारासाठी आयोजित शोभायात्रेला मुंबई नाका येथून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला. माजी नगरसेविका सुमन भालेराव, अर्चना थोरात, तसेच माजी नगरसेवक संदीप लेनकर यांच्या नियोजनाखाली प्रभाग १५ मधील विविध ठिकाणी शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. मतदारांशी थेट […]
शिर्डी :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीने प्रचारसभांचा धडाका लावला असून, शिर्डीतील सभेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. प्रियंका गांधींनी आपल्या भाषणाला ‘जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘साईबाबाजी की जय’ अशा घोषणांद्वारे सुरुवात केली. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्र ही सामाजिक क्रांतीची भूमी […]