निफाड तालुक्यातील वाहेगाव येथे 20 वर्षीय रोहित लहाणू पवार याचा मृतदेह गोई नदीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रोहित 3 नोव्हेंबर रोजी सकाळी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता. मात्र, त्यानंतर त्याचा कोणाशीही संपर्क झाला नाही. कुटुंबीयांनी माहिती दिल्यानंतर लासलगाव पोलिसांनी तपास सुरू केला. शोधादरम्यान, गोई नदीच्या काठावर त्याचे दप्तर सापडले. यानंतर नदीत […]
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतीमान झाल्या असल्या तरी, महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नाशिक शहरातील समस्यांमध्ये वाढ होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या महासभा किंवा स्थायी समिती सभा आयोजित न केल्यामुळे नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम थांबले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. महिलांनी वेळोवेळी मोर्चे काढून प्रशासनाचा निषेध केला असला तरी, केवळ […]
त्र्यंबकेश्वर, 4 डिसेंबर 2024 संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा पूर्वतयारीसंदर्भात बैठक घेण्यात आली. यात्रा 25 जानेवारी 2025 रोजी होणार असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसोबतच या यात्रेचे नियोजन व्यापक प्रमाणावर सुरू आहे. बैठकीत विविध सरकारी विभागांचे अधिकारी, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व […]
राज्यात महायुती सरकारचा मुख्यमंत्रिपदाचा पेच अखेर सुटला आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली असून तेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. आज भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर विधिमंडळ गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर आशिष शेलार व रवींद्र चव्हाण […]
महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या आशा पुन्हा जागवल्या आहेत. प्रस्तावित २३२ किमीचा नाशिक-संगमनेर-पुणे रेल्वेमार्ग कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी नव्या सरकारकडून निधी व सुस्पष्ट निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, सरकारने नाशिक-सिन्नर-शिर्डी मार्गाचा पर्याय सुचवला होता, परंतु तिन्ही जिल्ह्यांतून झालेल्या तीव्र नाराजीमुळे पूर्वीचाच मार्ग […]
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करतात. त्यांच्यासाठी प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा चैत्यभूमी आणि परिसरात केल्या जातात. कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी या सुविधांची पाहणी करून आढावा घेतला. विभागीय आयुक्त श्री. देशमुख म्हणाले की, चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत असून अनुयायांसाठी वैद्यकीय कक्षही […]
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशी, विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या एफ विभागाचे निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. ६ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत, असे […]
मुंबई : राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा रब्बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन […]
मुंबई : भारतात सन २०५० पर्यंत लहान मुलांची संख्या जगात सर्वाधिक, म्हणजे अंदाजे ३५ कोटी असेल. यादृष्टीने राज्यांनी आरोग्य सेवा, शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण, नोकरीच्या समन्यायी संधी निर्माण करणे व तंत्रज्ञान उपलब्धतेतील तफावत कमी करणे गरजेचे असून या क्षेत्रात अधिक गुंतवणूकीवर भर द्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते […]
भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सिंधूचा विवाह राजस्थानच्या उदयपूर येथे २२ डिसेंबरला होणार असून २४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. सिंधूचा होणारा जीवनसाथी व्यंकट दत्ता साई एक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी जेएसडब्ल्यू, सोलर अॅपल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये काम केले असून सध्या पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक […]