google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

यंदाही छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव रामशेजच्या अजिंक्य भूमिवर

author
0 minutes, 0 seconds Read

सह्याद्रीसाठी राबणारे टीम देहेरगड, सोमनाथ भुरबुडे यांचा गडमित्र पुरस्काराने सन्मान.

नाशिक वृत्त :- शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक यांच्या संयोजनाने यावर्षी १४ में रोजी सकाळी ७ ते ९ दरम्यान छत्रपती शंभूराजे यांचा जन्मोत्सवं “रामशेज मोहोत्सव”म्हणून साजरा केला जाणार आहे.
गेल्या १५ वर्षे अखंडित सुरु असलेल्या या कार्यक्रमात यंदाही विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून यंदा नाशिकच्या पश्चिम घाटातील गडकोटाच्या भूमितील राबता सोमनाथ भुरबुडे, व उपेक्षित गड म्हणून ओळख असलेल्या देहेरगडाचा वारसा अपरिमित कष्टाने संवर्धन करणाऱ्या किल्ले नाशिकच्या देहेरगड टीमला “गडमित्र”पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती शिवकार्य गडकोट संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी दिली आहे.

किल्ले रामशेजच्या गोमुखीद्वारात छत्रपती शंभूराजे जन्मोत्सवाची परंपरा यंदा ही कायम आहे, आदल्या रात्रीच दि १३ रोजी रात्री राम मंदिरात मुक्कामी जाऊन फुले हार तयार करणे, वारकरी भजनाचा पोवाडे गायनाचा कार्यक्रम होईल, पहाटे ६.०० वाजता किल्ल्याच्या द्वाराला हाराने सजवणे,गडपूजन,ध्वजारोहण,

सकाळी ठीक ८.०० वाजता गोमुखी द्वारात छत्रपती शंभूराजे यांची पालखी राम मंदिरातून येईल, त्यानंतर शंभूराजे जन्मोत्सवनिमित्त हातगड किल्ल्याचे शिवकालीन किल्लेदार विर गंगाजी उर्फ गोगाजी मोरे देशमुख व इतिहास अभ्यासक संजय बिरार यांचे हस्ते छत्रपती शंभूराजे,व श्रमदानं साहित्य यांचे पूजन केले जाईल,”किल्ले रामशेजचा अखंडित संवर्धनाचा प्रवास, व शिवकार्यची ओळख”राम खुर्दळ करुण देतील.व त्यानंतर ठीक ८.३० वाजता गडमित्र पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. हा कार्यक्रम केवळ गडकोट संवर्धनाच्या अखंडित अभ्यासपूर्ण कामकाजाला समर्पित असून यातून गडकिल्ले हेच शिवशंभुची रूपे आहेत त्यांची दैना घालवा असा संदेश दिला जाणार असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष भुषण औटे, मनोज अहिरे, सल्लागार गजानन दिपके,देवचंद महाले,संजय झारोळे,पर्यावरण विभागाचे शिवाजी धोंडगे,भारत पिंगळे,दुर्ग संवर्धक मयुरेश बिडवई,रोहित गटकळ,राज धनगर,जयराम बदादे, बाळू बोडके,प्रदीप पिंगळे, हभप कृष्णा महाराज धोंडगे यांनी केले आहे,

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *