google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

२० जानेवारीला लाखोच्या संख्येने नाशिककर मराठा समाज दिंडीने जाणार मुंबईत…

author
0 minutes, 1 second Read

नाशिकच्या सकल मराठा समाजाचे १०५ व्या दिवशी आंदोलनाची नाशिकच्या शिवतीर्थावर सांगता

नाशिक:- नाशिकहून असंख्य मराठा वारकरी दिंडी ने २० जानेवारीला कूच करायची आहे,याकामी गाव खेड्यांपर्यंत मराठा समाजाचा शेवटचा माणूस ही या आंदोलनात जोडायचा आहे.त्यासाठी मराठा गाव सभा घेण्याबाबत नियोजन यावेळी करण्याचा निर्णय नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाने घेतला,याकामी मराठा समाजाने सामील व्हावे असे आवाहन व निर्णय याठिकाणी घेण्यात आला,दरम्यान यावेळी गेल्या नाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या १०५ दिवसापासून सुरू असलेले साखळी उपोषणाची आज सांगता करण्यात आली,यावेळी राम खुर्दळ यांनी प्रस्तावना केली त्यात मराठा साखळी उपोषणात जोडलेले असंख्यबसमज घटक,विविध जाती समुदाय,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मंडळी बघता मराठा आरक्षणाला विरोध करणारे पांढरपेशे याना ठिकाणावर आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे आता गाव खेद्यावरील मराठा जोडू व विक्रमी आंदोलन मुंबईत उभे करू,यावेळी नाना बच्छाव,निलेश ठुबे,विकी गायधनी,रोहिणी उखाडे यांच्या उपोषणात अखंडीत सहभागाबद्दल उपोषणात सामील सर्वांचे ऋण निर्देश करण्यात आला.

यावेळी करण गायकर यांनी मराठा आरक्षण लढा आता अधिक जोमाने करायचा व जरांगे पाटील यांनी सांगितले प्रमाणे आता गाव गावात मराठा सभा घेवून २० जानेवारीला मुंबईत कूच करायची असे त्यांनी सांगितले, त्यानंतर दत्ता गायकवाड,मविप्र चे ad नितीन ठाकरे,दिनकर पाटील,सुनील बागुल,ad कैलास खांड बाहाले यांनी विचार मांडले,विजय करंजकर यांनी सांगितले,की मुंबईतील आंदोलनात सर्व नेत्यांनी आंदोलनात सहभागी मंडळींना गाड्या उपलब्ध करून द्या,असे सांगितले.शेवटी नाना बच्छाव यांचे हातून शिव पुतळ्यास हार घालण्यात आला,तत्पूर्वी उपोषण सोडवन्यात आले,दरम्यान सकल मराठा समाजाची पुढील बैठक 30 डिसेंबर ला होणार आहे,यावेळी नाना बचछाव, राम खुर्दल चंद्रकांत बनकर,सुनील बागुल,नितीन रोटे पाटील,निलेश ठूबे,विकी गायधनी,सागर वाबळे,संजय फडोल,संदीप हांडगे,रोहिणी उखाडे,ममता शिंदे पाटील,एकता खैरे,पूजा धुमाळ,प्रफुल्ल वाघ,योगेश नाटकर,करण गायकर,ad नितीन ठाकरे,दुधारे सर,विजय करंजकर,दिनकर पाटील,पूजा धुमाळ,रोहिणी दळवी,सुधाकर चांदवडे,राजेंद्र शेळके,दत्ता गायकवाड,अण्णा पिंपळे,ज्ञानेश्र्वर सुरसे,सतीश नालकर,श्रीराम निकम,गौरव गाजरे,शिवाजी शेलार,संदीप बऱ्हे,प्रकाश धोंडगे,विकास रसाळ,भास्कर पाटील,मंगेश गोडसे,सागर कातडं,शशी मातेरे,शिवाजी शेलार,सुनील निरगुडे,संतोष पेल महाले,हर्षल पवार,योगेश कापसे,सुनीता पाटील,बाळासाहेब घडवजे,ज्ञानेश्र्वर कवडे,अंकिता मोरे,विकास गडाख,नितीन काळे,सुनीता पाटील,यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *