google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

पोलीस बतावणी करुन फसवणुक करणाऱ्या 02 सराईत आरोपीतांना अवघ्या 24 तासात जेरबंद करुन रु.2,72,000/- रुपयांचा मुददेमाल केला जप्त

author
0 minutes, 2 seconds Read

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

आपला महारष्ट्र वृत्त जालना :- दिनांक 06/06/2024 रोजी 14:55 वाजेच्या सुमारास नवीन मोंढा ते वरकड हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रोडवर दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी नामे दिलीपराव दत्तु क्षिरसागर, वय-63 वर्ष, व्यवसाय-शेती, रा. कडवंची, ता.जि.जालना यांना पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडील दीड तोळयाची सोन्याची चैन व दोन तोळयाच्या दोन सोन्याच्या अंगठया हातचलाखी करुन काढुन घेतल्या त्यामुळे फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे सदर बाजार जालना गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक साहेब, जालना व मा. अपर पोलीस

अधिक्षक साहेब, जालना यानी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक 07/06/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तांत्रिक विश्लेषण, माहितगार

यांचे कडुन माहिती संकलित करुन गुन्हा हा अत्यंत शिताफिने उघड करुन गुन्हयातील आरोपी नामे 1) तन्वीर हुसैन अजीज अली, वय-49 वर्ष, रा. हुसैन कॉलनी, चिद्री रोड, बीदर, जि. बीदर, राज्य कर्नाटक 2) जाफर हबीब वेग, वय-25 वर्ष, रा.शिवाजीनगर, परळी, ता. परळी, जि.बीड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली व गुन्हयामध्ये हातचलाखी करुन फसवणुक केलेला रु.1,62,000/- किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठया व एक सोन्याची चैन असा मुददेमाल, गुन्हा करतांना वापरलेला टीव्हीएस अपाचे मोटार सायकल व आरोपीतांचे मोबाईल असा एकुण रु.2,72,000/- रुपयांचा मुददेमाल आरोपीतांनी काढुन दिल्याने तो गुन्हयाचे तपासकामी जप्त केला आहे.

नमुद गुन्हयातील आरोपी यांनी गुन्हा करतांना वापरलेल्या मोटार सायकलबाबत अधिक माहिती मिळविली असता सदर मोटार सायकल ही पुणे येथुन चोरी केलेली असल्याचे आढळुन आले असुन त्यावर पोलीस ठाणे कोंडवा, पुणे येथे गुन्हा दाखल आहे.

तसेच आरोपीतांनी आणखी अशाच प्रकारचे चंदनझिरा व भोकरदन हददीमध्ये गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ, सपोनि, योगेश उबाळे, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, रामप्रसाद पव्हरे, सचिन चौधरी सर्व स्थागुशा, जालना यांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *