१७ डिसेंम्बरला बैठकीसाठी आंतरवेल सराटीला नाशिकहुन उपोषणकर्ते जाणार.

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिकच्या शिवतीर्थावर मराठा साखळी उपोषणाचा ९१ वा दिवस.

नाशिक :- नाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या ९१ दिवसापासून सकल मराठा समाज नाशिक जिल्हा वतीने अखंडित मराठा साखळी उपोषण सुरू आहे.येत्या १७ डिसेंबर ला मराठा योद्धा आंतरवेली सराटी येथील बैठकीसाठी नाशिकहून उपोषणकर्ते संबंधित बैठकीसाठी जाणार असल्याची माहिती मुख्य उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी दिली.

मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण मिळावे यासाठी नाशिकच्या शिवतीर्थावर ९१ दिवसापासून अखंडित मराठा साखळी उपोषण सुरू आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील आंतरवेल सराटीच्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण व सभेद्वारे महाराष्ट्रातील लाखोंच्या कोट्यवधी मराठ्यांच्या सभेद्वारे आधीच ओबीसीतील मराठ्यांचे आरक्षण दाबून मराठा समाजाला देशोधडीला लावण्याचा प्रकार हाणून पाडण्यासाठी उपोषणे सभा सुरू आहे.राज्य सरकारला २४ डिसेंम्बर पर्यंत आरक्षण द्या नाहीतर मुंबईत चक्काजाम साठी कोटी मराठा धडकणार या नियोजनासाठी १७ डिसेंम्बरला राज्यातील मराठा आंदोलकांची एकत्रित बैठक होणार आहे.
शेतकरी कुटुंबातील मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार आंतरवेल सराटीला १७ डिसेंम्बरला नाशिक जिल्ह्यातील उपोषण कर्ते मोठ्या संख्येने जाणार आहे.दरम्यान नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यातील विविध गावांत,तालुक्यातील उपोषण कर्ते ही आंतरवेल सराटीला जाणार आहे,जिल्ह्यातील हजारो उपोषण कर्ते मराठवाड्याकडे जाणार आहे,

नाना बच्छाव-
मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा अंतिम स्थितीत आहे.सरसकट मराठा समाजाचे ओबीसीकरण हीच एकमेव मागणी मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांची समस्त मराठ्यांची आहे,मात्र सरकार पुरस्कृत मंत्री आमदार खासदार यांना मराठ्यांच्या अरक्षणापेक्षा ओबीसी मत गठ्ठ्याचे पडले असल्याने मूळ मागणी बाजूला सारण्याचे षडयंत्र ओबीसी नेत्यांची हुजरेगिरी सुरू आहे.मात्र ३६ लाखांपेक्षा अधिक पुरावे हेच मराठा आरक्षणासाठी मूळ कायदेशीर आधार आहे,मात्र पुरावे नसलेले मराठा समाजाला ही सरसकट आरक्षण ओबीसी मधून यासाठी आता निर्वाणीचा लढा होईल,सरकारने मराठा समाजाचा अंत बघू नये,अन्यथा केंद्र राज्य सरकारला पेलवणार झेपणार नाही,

अशी माहिती सकल मराठा समाजाच्या नाशिकच्या साखळी उपोषणातून उपोषणकर्ते नाना बच्छाव,राम खुर्दळ,चंद्रकांत बनकर,ऍड कैलास खांडबहाले,नितीन रोटे पाटील,अण्णा पिंपळे,नितीन डांगे पाटील,प्रफुल्ल वाघ,सुधीर पौल,हिरामण नाना वाघ,
निलेश ठुबे,विकी गायधनी,शरद अण्णा लभडे,श्रीराम निकम,विकी देशमुख,संदीप खुटे पाटील,योगेश नाटकर,योगेश कापसे,राम गहिरे,सुधाकर चांदवडे,अनिल आहेर, प्रकाश आहेर,संजय पांगारे,संदीप ब-हे,सचिन पवार,गौरव गांजरे,अरुण पळसकर,सचिन पवार,रविंद्र बोचरे,अरुण मोरे,निलेश शिरसाठ,ज्ञानेश्वर शिंदे,तानाजी आरोटे,ज्ञानेश्वर सुरासे,सागर वाबळे,सुभाष शेळके,ऍड रामनाथ गुळवे, संदीप हाण्डगे,डॉ संदीप देवरे,डॉ तिदमे,गौरव गाजरे,रोहिणी उखाडे,स्वाती कदम,ऍड शिल्पा चव्हाण,ऍड शीतल भोसले,ममता शिंदे,एकताताई खैरे,ऍड स्वप्ना राऊत,वंदना पाटील,मंगलाताई शिंदे,सुमन महाले,रोहिणी दळवी,माधवी पाटील,ऍड स्वप्ना राऊत,मनीषा जाधव,रविंद्र बोचरे,नितीन खैरनार,इंगळे बाबा,विकास रसाळ,अरुण कळसकर,गणेश पाटील,ज्ञानेश्वर कवडे,देवकरसर,भास्कर पाटील,मंगेश पाटील यासह अनेकजण उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *