google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

हिंदू एकता तर्फे हिंदू तिथीने द्वारका येथे शिवजयंती साजरी

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक –
महाराष्ट्रासह नाशिक जिल्हा व शहरात हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ तर्फे तिथीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शेकडो वर्षांपासून संपूर्ण हिंदू समाज शिवरायांची जयंती तिथी नुसार साजरी करत असून यंदाही मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली.

   शहरातील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंग चौक, द्वारका सर्कल येथे शिवरायांच्या पुतळ्यास शांतिगिरी महाराज व हिंदू एकताचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास खैरे, शाहू महाराज खैरे, सतीश पुरोहित, शरद काळे, सुनील परदेशी, शशी हिरवे, प्रमोद नाठेकर सह आदी मान्यवर उपस्थित होते.

   या प्रसंगी संपूर्ण चौकात भगवे ध्वज, पताका लावून भगवे वातावरण निर्माण करण्यात आले होते तसेच लायटिंग लावून संपूर्ण परिसर प्रकाशमय करण्यात आला होता.  यावेळी उत्सव समिती अध्यक्ष किरणसिंग पवार यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्याचा स्वागत सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिवरायांची आरती करण्यात आली.

   हिंदू एकता नेहमी शिवजयंती दिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना आणि इतर महापुरुषाच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करते. म्हणुन सकाळी ९ वाजेपासून शहरातील नाशिकरोड, सिबीएस, शालिमार, मालेगाव स्टँड, पंचवटी येथील सर्व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदू एकता शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष किरणसिंग पवार, उमेश पाटील, अतुल रयसिंगे, अनिल जाधव, स्वप्नील काथवटे, प्रसाद दादा बावरी, महादु बेंडकुळे, प्रतापसिंग पवार, काशिनाय बेडकुळे, राजेश तेलंग, मोहन पवार, बब्बु शेख, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब थोरात, राजेश धूमाल, कृष्णा पवार, अभिजित राजपूत, शिवा पवार, देवा पवार, प्रेम पवार, अशोक गांगुर्डे, नितीन काठवते, राजू गाडगीळ, राज शेट्टी, रोशन जाधव,भारत सदभैय्या, कृष्णा आवटी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *