नाशिक शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार उद्या, 28 ऑक्टोबर आणि मंगळवारी, 29 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणार आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नाशिक वाहतूक पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बंदी लागू करण्याची घोषणा केली आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
- मेहेर सिग्नल ते सीबीएस सिग्नल मार्ग – दोन्ही बाजूंनी वाहतूक सकाळी 10 ते सायंकाळपर्यंत बंद
- त्र्यंबक नाका-टपाल कार्यालय-खडकाळी-शालिमार-सांगली बँक सिग्नल मार्गे इतरत्र वाहतूक
- अशोक स्तंभ-गंगापूर रोड-पंडित कॉलनी-जुना गंगापूर नाका मार्गे इतरत्र वाहतूक
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी या वाहतूक बदलांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे. जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी निवडणुकीशी संबंधित अधिकृत वाहनांसाठी, तसेच पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका, व शववाहिका वाहनांसाठी मार्ग खुले ठेवले आहेत.