google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यां वाहन धारकांवर ५०० रुपये दंड आकारणी करत कारवाई…

author
0 minutes, 1 second Read

नांदगाव :- नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महामार्गावरील रेल्वे ओवरब्रिजचा एक भाग कोसळल्याने या घटने नंतर वाहतूकिसाठी हा रस्ता बंद करण्यात आला असून ही वाहतूक लासलगाव व विंचूर मार्गे वळविण्यात आली आसून काही मार्गे मालेगाव-नांदगाव मार्गे अहमदनगर,येवला,संभाजीनगर कडे वळवण्यात आल्याने नांदगाव येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निर्दशनास आल्याने नांदगाव हा मार्ग आसल्याने आवजड वाहनाची वर्दळ वाढली आहे या मुळे नांदगाव शहरात वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने वाढत आसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

नांदगाव येवला रस्ता आरुंद आसल्याने आवजड वाहनाची संख्या वाढल्यामुळे आपघात होण्याची शक्यता आहे स्टेट बॅंक-शनी मंदिर या भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे प्रकार घडतं आहे.नांदगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील कॉलेज- शाळेतील विद्यार्थी तसेच सायकल वरून जाणारे शाळकरी मुल यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.वाहतुकीची कोंडी होत असल्याने याठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असुन पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार भगवान सोनवणे ,जिल्हा वाहतूक शाखा शिपाई अंकुश शिंदे,दीपक मुंडे,धर्मराज आलगड पोलिस शिपाई साईनाथ आहेर आदींनी वाहतुकीवर अडथळा निर्माण करणाऱ्यांवर ५०० रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला असून यावेळी ट्रिपल सीट मोटारसायकल चालवणे,नो पार्किंग आशा वाहनांवर पोलिसांनी कडून कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईने वाहनचालकांना शिस्त लागेल व अशा कारवाया रोजच सुरू राहतील असे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्याकडून सांगण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *