google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

वारी आली तरी इंद्रायणी फेसाळलेलीच! वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात…

author
0 minutes, 0 seconds Read

आळंदी, पुणे: संत ज्ञानेश्वर महाराजांचा १९३ वा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी मात्र अद्यापाही फेसाळलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या दहा वर्षपासून इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्न प्रलंबित आहे.

इंद्रायणी प्रदूषणावर अनेकदा उपोषण झाले, आंदोलने झाली. मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. आजूबाजूला असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, त्यातून नदीत सोडले जाणारे सांडपाणी यामुळे नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळत आहे. वारीच्या वेळी लाखो वारकरी या इंद्रयणीत आंघोळ करतात, यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. केमिकलं युक्त पाण्याने इंद्रायणी फेसाळली आहे. त्यामुळे तिच्या संवर्धानाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *