नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे यंदाचे कार्यसन्मान पुरस्कार जाहीर

मान्यवरांच्या हस्ते ३ मार्च रोजी होणार वितरण नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही कार्य सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या सोहळ्याचे यंदाचे हे २७ […]

मराठा समाजाला दिले कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण

कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता सारथी,अण्णासाहेब पाटील महामंडळाचे मजबुतीकरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई,दि.२७ : मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीत बसणारे आरक्षण दिले आहे.ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, ते आरक्षण एकमतानं दिलं आहे. कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण दिलं आहे. आज आरक्षण टिकणार नाही असे सांगून […]

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक २७: राज्यातील विकास कामांसाठी पुढील चार महिन्यात लागणाऱ्या आवश्यक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून केली जाणार असली तरी पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल हे दर्शविणारा हा अर्थसंकल्प आहे. यात दुर्बल घटक, शेतकरी, महिला, युवा अशा सर्वांचा विचार करण्यात आला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री […]

निरोप समारंभ भावनेशी जोडलेला असतो-डॉ.सिताराम कोल्हे

नाशिक प्रतिनिधी :- नाशिक-ज्या शाळेत आपण ज्ञानार्जनाचे काम करतो त्या शाळेच्या शेवटच्या शैक्षणिक वर्षाला निरोप देताना भावनिक होनं साहजिकच आहे.शेवटी गुरु शिक्षक आई-वडील फक्त माहुताचे काम करत असतात परंतु जीवनाची संपुर्ण लढाई स्वतःलाच लढायची असते.कष्टाला पर्याय नाही, संघर्ष हेच जीवन आहे असे मत नाशिक शहराचे पोलिस उपायुक्त डाॕ.सिताराम कोल्हे यांनी व्यक्त केले.कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय […]

नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी भविष्य निधी ऑफिसमध्ये चक्क आयुक्तांनीच केले नियमांचे उल्लंघन

शिपायांजवळ मोबाईल जमा करा नंतर मला भेटा नाशिक जिल्हा पीएफ ऑफिसमध्ये , आयुक्तांचा गजब कारभार नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी भविष्य निधी ऑफिसमध्ये चक्क आयुक्तांनीच केले नियमांचे उल्लंघनपत्रकारांना भेटण्यास नकार , बाहेर मोबाईल जमा करा नंतर मला भेटा, काय काम आहे ते शिपाईला सांगा तरच आत प्रवेशदिनांक २१/०२/२०२४ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आपला महाराष्ट्र न्यूज […]

उंटवाडी येथील माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी निरोप देताना डॉक्टर सिताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी केले मार्गदर्शन

नाशिक वृत्त:- नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित उंटवाडी माध्यमिक विद्यालय नाशिक येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती नासिक शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर सिताराम कोल्हे हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ना ए सोसायटीचे उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष माननीय चंद्रशेखर मोंढे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र […]

आमदार राहुल ढिकले यांच्या घरावर मराठ्यांचा आक्रोश मोर्चा लोकप्रतिनिधींनी येणाऱ्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या संदर्भात आवाज उठवा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवून देऊ

नाशिक:- सकल मराठा समाज आरक्षणासंदर्भात येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनात भूमिका मांडावी यासाठी आज नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांना सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानासमोर आक्रोश आंदोलन करत निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मराठा आरक्षणासंदर्भात येत्या २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलविले […]

अशोकस्तंभावर उभारणार छत्रपतींची ६५ फुटी मूर्ती २२फूट रुंदी ७ टन वजनाची भव्य मूर्ती

नाशिक :- अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळातर्फे यंदाही सोमवारी (दि. १९) फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या शिवजन्मोत्सव मंडळातर्फे देखावा उभारणी कामाला नुकताच विधिवत पूजनाने प्रारंभ करण्यात आला. मंडळातर्फे यंदा ६५ फूट उंचीची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारली जाणार आहे. शिवाजी महाराज मूर्तीच्या एका हातात ४१ फूट उंचीचा राजदंड तर […]

सकल मराठा समाज नाशिक जिल्ह्याचे जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्य सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन

तात्काळ अधिवेशन घेऊन सरकारला मराठा आरक्षणाची मागणी मान्य करन्याचा इशारा… नाशिक :- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मागील पाच दिवसापासून अन्न व जल त्याग करत आमरण उपोषण अंतरवाली सराटी या ठिकाणी करत आहे.त्या उपोषणाची दखल राज्य सरकारकडून घेतली जात नसल्याने राज्य सरकारच्या विरोधात आज नाशिक येथील शिवतीर्थ या ठिकाणी सकल मराठा समाज नाशिक ने […]

लोकसभा निवडणूक जाहीर महाराष्ट्र मध्ये होणार चार टप्प्यात निवडणूक voting loksabha election 2024

महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना सर्वच लोकप्रतिनिधी जोमाने तयारीला लागलेले आहे यामध्येच सर्व पक्षांच्या जागा वाटपाचे कोडे मात्र काही सुटेना परंतु निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या बिगल वाजले आहेत ११ एप्रिल ते २९ एप्रिल या दिवसांमध्ये लोकसभा निवडणूक घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्र मध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पहिला टप्पा -11 एप्रिल:(7 लोकसभा जागा) नागपुर, […]