google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

आठ दिवसात रखडले हजारो दाखले, नागरिकांचा संताप

author
0 minutes, 5 seconds Read

नाशिक : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जामुळे इतर दाखल्यांना फटका बसत असल्याचे समोर आले आहे. इतर दाखले निकाली निघण्यास तब्बल 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागत आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत अटी-शर्थींसह योजनेच्या सर्व तरतुदींमध्ये बसणाऱ्या सर्व महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. ही योजना जाहीर केल्यानंतर योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्व ठिकाणी महिलांची झुंबड उडाल्याचे चित्र आहे.

आठ दिवसात रखडले 34 हजारांहून अधिक दाखले 

नाशिकमध्ये (Nashik) लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचा इतर दाखल्यांना फटका बसला आहे. दाखले निकाली निघण्यास 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागत आहे. हजारोंच्या संख्येने अर्ज येत असल्याने उत्पन्नाचे दाखले, डोमेसाईल सर्टिफिकेट, जातीचे दाखले मिळण्यास विलंब होत आहे. आपले सरकार पोर्टलच्या सर्व्हरला समस्या असल्याने दाखले देण्यास विलंब होत असून एकट्या नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) आठ दिवसातील रखडलेल्या दाखल्याची संख्या 34 हजाराहून अधिक आहे.  लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असणारे दाखले काढण्यासाठी एकच गर्दी होत असल्याने इतरांना त्याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. 

लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

दरम्यान, लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेचे अर्ज पोर्टल / मोबाइल अँप / सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. नारीशक्ती अॅपवरही अर्ज भरता येईल. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

अर्ज भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी दिलेल्या मुदतीपर्यंत 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व पात्र महिला अर्ज करू शकतात. राज्य शासनानं या योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत 15 जुलैपर्यंतची ठेवली होती. या मर्यादेत शासनाने सुधारणा केली असून आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1 हजार 500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.     

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *