शेतकरी आंदोलनातील एक लढवय्या नानासाहेब बच्छाव आहे तरी कोण ?

author
0 minutes, 0 seconds Read

नानासाहेब बच्छाव: शेतकरी आंदोलनातील एक लढवय्या आहेत. मुळात नानांचा जन्म. ५०० लोकवस्ती असलेल्या शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना येणाऱ्या संपूर्ण अडचणी त्यांनी जवळून पाहिल्या आहेत. नानांचे मूळ गाव नांदगांव तालुक्यातील हिंगणे देहरे. यामध्ये मुख्य व्यवसाय शेती आहे, व शेतीत सततची दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतीवर अवलंबून असलेले कुटुंब म्हणून नाना नाशिक येथे आले. त्यांनी विविध प्रकारच्या नोकऱ्या केल्या, दूध टाकण्याचे काम केले, चहाची टपरी चालवली, आणि काही काळ रिक्षाही चालवली. हे काम चालू असताना सामाजिक कार्य देखील मोठ्या प्रमाणात चालू ठेवले.

नानासाहेब बच्छाव हे शेतकरी आंदोलन आणि सामाजिक कार्यक्षेत्रात मागील २५ वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांनी शेतकरी वाचवा अभियानाचे संयोजक म्हणून ७/८ वर्षे काम केले, त्याच बरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाप्रमुख पद ५ वर्ष त्यांच्याकडे होत.नंतर शेतकरी संघर्ष संघटनेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ते नंतर प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम केल
त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला या मध्ये शेतकरी कर्जमुक्त व्हावा म्हणून २०१६ साली जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या १० दिवस बंद ठेवल्या दुध भाजीपाला मुंबईला न जाऊ देता सातत्याने संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले म्हणून कर्जमाफी झाली.

आहे आणि अनेक वेळा जेलवारी सुद्धा केली आहे. यामधे २०१८ साली दुध आंदोलनात सक्रिय सहभागी होत ठाणे जिल्हात सहका-यासह मुंबईकडे जाणारे दुधाचे टँकर अडवले म्हणून त्यांना २१ दिवस तळोजा सेंट्रल जेलमध्ये पोलीस कोठडी झाली होती.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वात अनेक शेतकरी आंदोलने यशस्वीपणे पार पडली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे हक्क प्रस्थापित झाले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427