नाशिक :- नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा रुग्णालयासमोर (दि २६ सप्टेंबर रोजी ) सुरु असलेल्या महाराष्ट्र जीवनन्नती महिला उमेद अभियानाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे,सकल मराठा समाजावतीने नाशिकच्या मराठा सेवकांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा पत्र अभियान आंदोलकांना सुपूर्द केले, यावेळी जिल्ह्यातील १५ तालुक्यातील महिला बचत गटाच्या समन्वयक, केडर, कर्मचारी वर्ग हे आंदोलनात सहभागी होते,
(महाराष्ट्र जीवनन्नती अभियानाच्या महिला अभियान (उमेद अभियान), कर्मचारी व महिला बचत गटाच्या गाव पातळीवरील केडर्स,कर्मचारी जे कंत्राटी म्हणून आहेत,उमेदच्या या सर्व घटकाना शासकीय सेवेच्या स्वतंत्र विभागात समाविष्ट करावे,मध्यंतरी वाढवलेलं अल्प मानधन वाढवावे, या मागणीसाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालया समोर उमेदच्या जिल्हाभरातील महिलांचे धरणे आंदोलन झाले, उमेद अभियान हे ग्रामीण भागाची म्हणजे गावखेड्याची बचत गट व शासकीय योजना घरोघरी नेण्याचे मूलभूत काम करीत आहे, या उमेदच्या मागण्या निवडणुकी आधी पूर्ण करा अश्या मागणीचे पत्र नाशिकच्या सकल मराठा समाजाने उमेद नाशिकच्या जिल्हाध्यक्षा सरस्वती खुर्दळ यांना सुपूर्द केले.यावेळी सकल मराठा समाज उमेदच्या आंदोलनात कायमच आहे, आमचे सामाजिक दायित्व म्हणून गरजवंत गोरगरीब शेतकरी, मंजूर, खेड्या पाड्यातील कारागीर,निराधार कुटुंबाना बचत गटाच्या माध्यमातून अर्थिक स्वावलंबी करणाऱ्या उमेद अभियानाला आमचा कायमच पाठिंबा आहे, उमेदच्या महिला लाडक्या बघिणी नाहीत का? त्यांना तातडीने न्याय दया,आम्ही सकल मराठा समाज कायमच त्यांच्या मागण्या लावून धरेल, असे सकल मराठा समाजाच्या मराठा ऍड स्वप्ना राऊत यांनी असे आवाहन यावेळी केले,यावेळी सकल मराठा समाजाचे प्रवक्ते राम खुर्दळ,ऍड स्वप्नाताई राऊत,अनिल आहेर,महेंद्र बेहेरे,स्वाती आहेर, प्रचारप्रमुख ज्ञानेश्वर सुरासे,प्रल्हाद जाधव,ध्रीमंत महाराज बागल हे मराठा सेवक यावेळी उपस्थित होते.