मराठ्यांचे क्रांतिसूर्य कै. आण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतीस उजाळा
नाशिक :- नाशिक, शिवतीर्थ सीबीएस: गरीब, होतकरू आणि कष्टकरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अखंड लढा उभारणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९१व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ, नाशिक जिल्हा यांच्या वतीने शिवतीर्थ सीबीएस येथे अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस श्री. राजेंद्र शेळके, श्री. नानासाहेब बच्छाव, श्री. व्यंकटेश मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरव गाजरे यांनी केले. शिवसेना उपनेते सुनिल बागुल, प्रदेश सरचिटणीस योगेश नाटकर, शहराध्यक्ष संजय फडोळ, ॲड. स्वप्ना राऊत, ॲड. कैलास खांडबहाले आणि शोभा सोनवणे, यांनी अण्णासाहेबांच्या कार्याचा गौरव करत मराठा आरक्षणासाठी त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी मराठा महासंघाचे संघटन संपूर्ण जिल्ह्यात पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला आणि आगामी काळात गावागावांत शाखा सुरू करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. यावेळी मराठा आरक्षण लढा अधिक तीव्र करण्याचा संकल्पही करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन समीर व्यवहारे यांनी केले होते. कार्यक्रमास राजेंद्र खापरे, राजाभाऊ जाधव, अनिल आहेर, प्रल्हाद जाधव,संदिप हांडगे, सचिन पवार, सागर कातड, अनिल गायकवाड, जयंत वाटपाडे, वैभव वडजे, अविनाश वाळुंजे, सचिन पवार, नितीन काळे,त्रिलोक भाबरे, महेंद्र बेहेरे, नितीन खैरनार, संदीप बह्रे, विलास गडाख आदी मान्यवर उपस्थित होते.