आयुष्याचे सिहांवलोकन आणि मिळालेल्या यशाच गुपीत म्हणजे- पासवर्ड सुचण्याचा

author
0 minutes, 0 seconds Read

माणुस हा विचार शिल प्राणी आहे. आयुष्यात अनेक गणीत तो पटकन सोडवतो तर काही गणिताचा ताळमेळ चुकत जातो. कधी दोन पर्याय समोर असतानाही आपण विचलित होतो.पण पर्यायातुन एक निर्णय घ्यावा लागतो.योग्य वेळी निर्णय घेतला नाही तर चुका घडतात आणि आपण केलेली कृती चुकीची ठरते. योग्यवेळी केलेली कृती आपल्याला पश्चातापापासून वाचवते व होणारा मनस्ताप आपल्याला सहन करावा लागत नाही. त्यासाठी प्रतीकात्मक आणि सकारात्मक या दोन विचारांची आपण खऱ्या अर्थाने काळजी घेण्याची गरज आहे. आयुष्यात अनेक घडलेल्या घटनांचा मागोवा घेतल्यानंतर आपल्याला जे जे सुचते त्याची नोंद केली तर संस्कारमय व्यक्तिमत्व, संस्कृती याची जाणीव आपल्याला आणि संवेदनशील मनाला नेहमीच भावत असते. पोलीस अधिकारी डॉ. सिताराम कोल्हे यांनी आपल्या सापडलेल्या एक अद्भुत सूत्र पासवर्ड सुचण्याचा या पुस्तकातून हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी सुचण्याची भूमिका आणि पाहिजे ती गोष्ट मिळवण्यासाठी सूचने कशाप्रकारे महत्त्वाचे असते याचा मागोवा आपल्या पुस्तकातून घेतला आहे. विविध दैनंदिन घडणाऱ्या गोष्टींचा विचारपूर्वक अभ्यास करण्याची गरज किती आहे. सुचण्याची संकल्पना व उपयुक्तता, सूचन्याचे शास्त्र व प्रकार, सुचण्याचे स्तर व परिपूर्णता, सुचण्याचे महत्त्वपूर्ण घटक, माझे सूचने प्रभावी होण्याचे घटक, सूचन्याचे परिणाम व महत्त्व, सुचन्याची कठीण उपयुक्तता तंत्राचा वापर, निर्णय घेताना सूचन्याच्या तंत्राचा वापर, हवे ती गोष्ट मिळवीण्यासाठी सुचण्याची भूमिका, सुचण्याचा इतर भागाशी संबंध, विकसित झालेल्या सूचन्याच्या तंत्राची धार कायम कशी ठेवावी, सूचन्याच्या तंत्राचा योग्य वापरामुळे यशस्वी झालेल्या व्यक्तींची उदाहरणे, सुचण्याची मानसशास्त्रीय चाचणी, सुचण्यातील करिअर व संधी, सुचण्याचे तंत्र कुठे व कसे वापरावे, सुचण्याची मानसशास्त्रीय चाचणी, सुचण्यातील करिअर व संधी अशा विविध भागातून सुचण्यासाठीच्या मनात आलेल्या विचारांची विकास प्रक्रियेतील बिंदू म्हणजे “पासवर्ड सुचण्याचा” अर्थात पासवर्ड हा गुप्त शब्द असून सुचण्याची प्रतिभा विकसित करण्याचा प्रयत्न आणि त्याची सापडलेले गुपित डॉ. सिताराम कोल्हे यांनी अतिशय मार्मिकपणे या पुस्तकातून मांडले आहे. अर्थात या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून या पुस्तकात नक्की काय संदर्भ असतील हे सहजपणे समजणे तसे अवघड आहे.पण तरीही अतिशय मार्मिकपणे या मुखपृष्ठाची निर्मिती केली असून घोडेस्वाराच्या हातातील रवी हे सुचन्याचे घटक आहे. रेसकोर्स
ट्रँक सचन्याच्या घटका़ंची उजळणी घोडा सुचन्याचा वेग दर्शवत असुन, घोडेस्वार आपला वेग लगाम मनावरील ताबा अर्थात कंट्रोल अशी विविध मनस्थिती परिस्थिती यांचा विचार करून या मुखपृष्ठाला अधिक गतीमान करत क्षणभर विचार करायला भाग पाडल्याशिवाय रहात नाही हे नक्की. पोलीस उपायुक्त म्हणून कारभार सांभाळत असतानां कर्तव्य वर राहून जे पाहिले अनुभवले याचे मंथन या पुस्तकातुन मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न डॉ. कोल्हे यांचा आहे. त्यांनी आपला अनुभव स्वतःबद्दलचा प्रवास लिहिण्याची एक उर्मी निर्माण केली आहे .आकलन शक्ती, चांगली बुद्धिमत्ता तसेच काम करतानां आलेला अनुभव त्यातुन मिळालेली ऊर्जा यांची सांगड घालत त्यांनी आयुष्यात यशस्वी मार्गक्रम करत प्रवास केला. आपल्या प्रवासात वेगवेगळे अनुभव त्यांना प्रगल्भ करत गेले. गुन्हेगारी जगताशी लढताना त्यांनी जवळून पाहिलेले अनेक अनुभव त्यांना सापडत गेले. डॉ. सिताराम कोल्हे हे पोलीस खात्यात काम करत असल्यामुळे वेगवेगळ्या आलेल्या अनुभवाची शिदोरी त्यांना कामात आली. अनेक प्रकारची माणसं, त्यांचे वेगळेपणं, त्यांच्या वेगळ्या समस्या गुन्हेगार आणि माणसांच्या प्रवृत्ती त्यांना रोजच पाहायला मिळाल्या त्यामुळे आयुष्याचा सिंहावलोकन आणि सापडलेले यशाचं गमक म्हणजे पासवर्ड सुचण्याचा या पुस्तकाची निर्मिती करताना त्यांनी अनेक अनुभव व आजपर्यंतच्या वाटचालीतील कडु गोड प्रसंग व छंद जोपासले आहेत. शरीर मन मेंदू आणि सूचने यातून सूचन्याची जी संकल्पना आहे. ती आपल्या एक विचारांचा धागा निर्माण करत विचारांना वेगळा आयाम प्राप्त करून देत असते. शारीरिक , मानसिक, आरोग्य, अध्यात्म, छंद, सामाजिक स्थान, आणि आर्थिक स्थैर्य ,आत्मबल, कुटुंब स्वास्थ्य, वेळेचे व्यवस्थापन, बुद्ध्यांक व भावनांक हे सुचण्याचे खरे घटक आहेत. डॉ. कोल्हे यांनी विचारांचे मंथन व अनुभवाचे अवलोकन करून कोणत्याही अभ्यासक्रमात किंवा पुस्तकात तसेच गुगलवर सुद्धा सापडणार नाही अशा विचारांना त्यांनी एक वेगळी प्रक्रिया निर्माण करून हा पासवर्ड सूचनाचा निर्माण केला आहे. निर्णयाक परिस्थितीत असताना किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये मनातील विचारांचे आणि मेंदूतील लहरीचे एकत्रिकरण होऊन ती गोष्ट अंतर्मनातून बाहेर मनात येणे आणि आपल्याकडून कृती घडणे म्हणजेच सुचणे हाच खरा सुचण्याचा पासवर्ड आहे. नोकरीच्या निमित्ताने व आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांना अनुसरून त्यांनी आयुष्यातील विविध संकल्पना आणि अनुभव एकत्रित करून आलेल्या अनुभवांचा एक पासवर्ड तयार केला आहे. ज्यातून माणसाला सुचण्याची एक मिळालेली उपयुक्तता मिळत असते. शरीर आणि मनाचे नाते अतूट असले तरी, मन विचार विश्वास आणि भावनिकता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात .व्यायाम, पोषण, झोप, आणि स्वंय चा अभ्यास करता आला पाहिजे. चिकाटी, अनुकूलता, नियंत्रण, सहनशक्ती, सामाजिक, क्वेश्चन तंत्र, सातत्य, सेल्फ अपडेशन, प्रतिक्रिया , आत्मपरीक्षण, सकारात्मक विचारसरणी, विनोद शैली, सहानुभूती व समानार्थी आशावाद आणि उद्दिष्ट ठरवणे अशा विविध बाबी समृद्ध असल्याशिवाय माणूस भक्कम उभा राहू शकत नाही. मनाला उभारी देणारे व मनातील आशावाद जिवंत ठेवणारे अनेक सुंदर गाण्यांच्या ओळी माणसाला उमेद देत जातात. म्हणून माणसाने नेहमी आशावादी असावे हा आशावाद डॉ. सिताराम कोल्हे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला आहे. जसे की
दिल हे छोटासा छोटीसी आशा मस्ती भरे मन की भोली सी आशा हे गाणे त्यांना जितके प्रचंड आवडते तितकेच हे गाणे त्यांना नवीन आशावाद निर्माण करण्यासाठी प्रेरणा देत असते. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेल असे नाही. मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडत असल्या तरी,आपण जिवनात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगायलाच हवा.यावर कोल्हे यांचे ठाम मत आहे. सकारात्मक विचार शिवाय चांगले सुचण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. खरे तर मेंदूची धार तीव्र ठेवण्याचा आशावाद डॉ. कोल्हे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला आहे. ठेविली अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी माणसाच्या जीवनातील चढ उताराला एक वेगळी दिशा देतात. कधी उदास उद्दीग्न आणि दुःखी होऊन आपण जर विचार केला तर, आपले निर्णय चुकत असतात. आणि अशा अयोग्य चुकीच्या कृतीमुळे आपल्याला पश्चाताप, दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण योग्य निर्णय आणि योग्य विचार करण्याची गरज असून, आत्मविश्वासाने आपण निर्णय घेण्याचा विश्वास जागवला पाहिजे. अत्यंत परिस्थिती बिकट असली तरीही निराश न होता नकारात्मक कडे न वळता चिडचिड न करता नशिबाला दोष न देता आपण काही अंतरावर चालत जाऊन नवे स्वप्न पेरण्याचा अट्टाहास केला पाहिजे. कारण ज्यांचे सूचने शशक्त आहे. अशा लोकांच्या मनात तात्पुरत्या स्वरूपात दुःख निर्माण होत असते. अशा परिस्थितीत मनाला आणि विचारांना सकारात्मक ठेवून जे घडलं ते माझ्या चांगल्यासाठीच घडलं असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा आपण अपघातातून सावरतो .स्वतःला वेळ देऊन पुढे काय करायचे याकडे आपण जर लक्ष दिले तर त्यातूनच सूचने सशक्त आणि चांगल्या आयुष्याकडे आपल्याला नेहमीच सकारात्मक दृष्टीने बघता येईल. असा विश्वास या पुस्तकातून निर्माण केला आहे .आपल्या सूचनेला एक वेगळी कृती असली पाहिजे. सुचण्याचे कौशल्य प्रभावी असणाऱ्या विविध क्षेत्रांमध्ये अनेक महान व्यक्ती झाल्या आहेत. त्यामुळे सूचने हे प्रभावी झाल्यास विकसित होणारे समूह आपल्याला विचार करायला भाग पाडतात. यश, पैसा ,प्रसिद्धी या गोष्टी माणसाला आपल्या आयुष्यात वेगळ्या शिखरावर घेऊन जात असतात. आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती योग्य वेळी योग्य निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन घेतल्यामुळे नेहमी आदर्श वाटू लागतात. चित्रपट अभिनेते अभिताब बच्चन यांच्या मोहबते या चित्रपटाने इतिहास घडवला त्यामुळे बिग बी याने न थांबता कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमातून कोणाचीही मदत न घेता ते आपले कर्ज फेडू शकले. संगीतकार झाकीर हुसेन जगविख्यात तबलावादक आजपर्यंत जगात त्यांच्या एवढी तबलावादनाची छाप कोणीही पाडलेली नाही. लता मंगेशकर यांनी सांगितले की जाकीर हुसेन यांच्या बोटामध्ये एक दैवी शक्ती आहे म्हणून जेव्हा जेव्हा त्यांचे बोटं तबल्यावर उमटतात तेव्हा कमालीचे ताल बाहेर पडतात. सामाजिक व्यक्ती मलाला
युसुफजाई वयाच्या सतराव्या वर्षी नोबल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरुण व्यक्ती नोबेल पारितोषिक विजेती आहे. दहशतवादी संघटनांना तीव्र विरोध करत एकदम इतक्या लहान वयात नोबेल पारितोषिक तिने मिळवले. नेल्सन मंडेला हे साऊथ आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती त्यांचा प्रवास अतिशय संघर्षात्मक होता त्यांचा रंगच संघर्षाचे मोठे कारण बनले. पण त्यांनी हिंसा न करता आयुष्याचा मार्ग स्वीकारला आणि सामाजिक बांधिलकी सकारात्मक क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी ते मोठ्या ताकदीने उभे राहिले. नेल्सन मंडेला यांना ते सुचले आणि त्यातून त्यांची प्रतिभा दिसून आली. एपीजे अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती त्यांचा शैक्षणिक प्रवास खडतर असला तरी शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उज्वल यश संपादन केले. शमीमा अख्तर वाढता अधर्म बाजूला करून एक कल्पना सुचली आणि एक चमत्कार घडायला लागला ही मूळची काश्मीरची शमीमाने काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कुटुंबीयांना गमावले आणि एका क्षणात सर्व काही संपून गेले. पण त्यावेळी एका सरहद संस्थेने तिला जीवनाची दिशा दिली. संगीताच्या बळावर धर्म प्रस्थापित करण्याचं काम ती करत होती. किरण बेदी भारताच्या पहिल्या महिला प्रशासकीय पोलीस अधिकारी त्यांचे व्यक्तिमत्व इतके उत्तुंग आणि भारदस्त त्यांच्या जीवनात अनेक मोठी कामे पूर्ण झाली. त्यांच्या जीवनावर अनेक पुस्तके लिहिली गेली व चित्रपटही निर्माण झाले. त्यांनी अनेक प्रकारचे व्हीआयपी सुरक्षा, दळणवळण नियंत्रण, अंमली पदार्थांचे नियंत्रण, दंगली नियंत्रण यात विशेष प्रामुख्याने भूमिका बजावत ही प्रकरणे हाताळले. त्यामुळे इतिहासात एक आदर्श पोलीस अधिकारी म्हणून त्यांचे नाव आहे. धीरूभाई अंबानी व्यापार विश्वाचे बेताज बादशहा म्हणून ओळख निर्माण केलेल्या धीरूभाई अंबानी यांनी एकेकाळी अवघ्या तीनशे रुपये पगाराने सुरुवात केली. आणि जगाच्या पाठीवर एक वेगळा आयाम प्राप्त केला. सुंदरबाई पिचाई गुगल चे सर्वोच्च सीओपद त्यांना बहाल करण्यात आले. विविध विषयांनुसार जे सुचले ते प्रभावी मांडण्याचा प्रयत्न या थोर व्यक्तीनी केल्यामुळे जगण्याच्या दिशा बदलत गेल्या. सुचल्याचं कौशल्य असलं पाहिजे. त्यामुळे प्रभावी असणाऱ्या विविध क्षेत्रावर आपणास एक वेगळी छाप पाडता येते. आपल्याला जे सुचते ते व सुचण्याच्या तंत्राची धार कायम विकसित ठेवण्यासाठी आपण सकारात्मक असले पाहिजे. असेही या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न डॉ. सिताराम कोल्हे यांनी केला आहे. आजचा काळ वेगाने बदलत असला तरी, वेगवेगळ्या प्रकारचे नवे ट्रेड घेऊन सर्व क्षेत्रात बदल होत आहे. या बदलामध्ये आपण आपल्या सकारात्मक विचारांची पडताळणी करून आपले व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी व ज्यामुळे आपण सतत आपल्या बुद्धीची धार तलक ठेवून जेणेकरून आपल्या सुचण्याला एक धार मिळेल अशी आशा आपण बाळगली तर, निश्चितच आपले अनुभव आणि जाणलेली गोष्ट याच्यात मार्ग काढत आपण अडचणी आणि चौकटी बाहेर सुंदर आयुष्याची उभारणी करू शकू असे मतही त्यांनी आपल्या या पुस्तकातून मांडले आहे. विनाकारण आयुष्यात अडथळे येत असतात पण त्यातून मार्ग काढून सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर बिकट परिस्थितीतूनही मार्ग सहजपणे काढता येतो. आपल्यातला चांगुलपणा सकारात्मकता आणि आशावादी दृष्टिकोन ही प्रत्येकाला नवी उमेद देत असतो. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते जगता आलं पाहिजे डॉ. कोल्हे पोलीस अधिकारी असूनही त्यांनी आपल्या कार्यप्रणालीला आयुष्यात नेहमीच सकारात्मक दृष्टीने पाहिले आहे. एमपीएससी द्वारे पोलीस उपनिरीक्षक पदापासून तर विशेष सुरक्षा विभागात कामकाज, सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर काम करताना त्यांनी पोलीस दलातील केलेली कामगिरी प्रशंसनीय आहे. पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह, राष्ट्रपती पदक, उत्तर महाराष्ट्राचा मानाचा स्तंभ म्हणून ओळख असणारा गिरणा गौरव पुरस्कार, पंचवटी रत्न पुरस्कार,अशा सन्मानानी सन्मानित झालेले डॉ. कोल्हे यांनी आपल्या सुचन्याच्या प्रक्रियेतून स्वःतला सिद्ध केले आहे. गुन्हेगारांची गुन्हेगारीवुत्ती तसेच त्यांच्या मानसिक व भावनिक पातळीचा अभ्यास या विषयावर संशोधन करत त्यांनी पीएचडी मिळवली आहे. विविध क्षेत्रात जसे की, शास्त्रीय, अध्यात्मिक, कायदा, मानसशास्त्र याबरोबर दैनंदिन जीवनात मानसशास्त्राचा व त्यासाठी ज्ञानाचाही त्यांनी अभ्यास केला आहे. त्यामुळे आयुष्य सुंदर बनवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला. आयुष्यात जगणे सुंदर बनवून नवे नवे तंत्र विकसित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. सुचण्याच्या प्रमाणा मधून उमलत्या मनाचे सूचने परिपूर्ण कसे असावे याचाही त्यांनी या पुस्तकातून मागोवा घेतला आहे. एखाद्याला पटकन सुचते तर एखाद्याला उशिरा का सुचते याचाही अभ्यास करताना त्यांनी सतत नाविन्यपूर्ण ध्यास घेऊन उत्तम आरोग्याचाही तेवढाच अंगीकार केला आहे. प्राणायाम, सूर्यनमस्कार, सुदर्शन क्रिया, योगासने, श्वसन क्रिया, पचन क्रिया, रक्ताभिसरण, मन, शांत आणि स्थिर राहण्यासाठी समाधान हे महत्त्वाचे आहे. याचाही त्यांनी सकारात्मक विचार केला आहे. मानसिक शारीरिक भावनिक दृष्ट्या माणूस नेहमी निरोगी असणे गरजेचे आहे. यासाठी योगा आणि प्राणायामाच्या माध्यमातून मनाला निरोगी ठेवण्याचा मंत्रही आपल्या या सूचन्याचा पासवर्ड या पुस्तकातून डॉ. कोल्हे यांनी मांडला आहे. पैसा म्हणजे सर्वस्व नाही .पण जगण्यासाठी पैसाच लागतो हे मात्र जरी खरं असले तरी पैसा हे साध्य नसून साधन असावे. म्हणजे पैसा मिळवणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय नसून जगण्यासाठी लागणारे साधन असायला हवे. असा विचार त्यांनी पुस्तकातून मांडला आहे. ज्या समाजात आपण राहतो ज्या समाजाचा आपण भाग असतो त्या समाजाचं आपण पण काहीतरी देणं लागतो .त्यामुळे सामाजिक स्थान आपण सांभाळले पाहिजे. असा मोलाचा सल्लाही आपल्या या पुस्तकातून त्यांनी मांडला आहे. आयुष्या कडून आपल्याला काय अपेक्षित आहे. जीवनात नक्की अडचण काय आहे. वर्तन आणि संस्कार यातून मानवी मन संस्कारमय करण्यासाठी आपण आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. सुचण्याच्या प्रमाणाचे ढोबळमानाने आपण परीक्षण केले तर आयुष्यातील अडचणींचा विचार करण्याला आपल्याला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. आहे ते स्वीकारा म्हणजे आयुष्य सुखी होईल असा मुख्य सल्लाही आपल्या पुस्तकातून डॉ. कोल्हे यांनी मांडला आहे. आयुष्य सुंदर आहे असा आशावाद मनात बाळगला तरच आपण आपल्याला गोंधळून टाकणाऱ्या अनेक गोष्टी दूर होतील आणि सकारात्मक परिस्थिती निर्माण होईल. सुचण्याची प्रगल्भता
संकटसमयी किंवा आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर सकारात्मकतेने विचार करण्यास मार्ग दाखवते. त्यासाठी सूचन्याची प्रगल्भता असल्यामुळेच माणूस आयुष्यात पश्चाताप , हळहळ ,सल व्यक्त करू शकत नाही कारण तो अनुभवाने संपन्न होण्याचा प्रयत्न करत असतो. आत्मप्रौढी दाखवण्याचा किंवा आत्मप्रौढी होण्याचा अट्टाहास या पुस्तकातून केलेला नाही. तर सकारात्मक विचारांच्या निर्णयात्मक वळणावर डॉ. कोल्हे यांनी माणूसपणाचा व समाधानाचा एक वेगळा पैलू या पुस्तकातून मांडला आहे. वेळेवर सुचलेली कृती म्हणजेच सुचण्याचा पासवर्ड आहे. आणि आयुष्य सुंदर आहे ते सुंदर निर्माण करण्यासाठी जे जे लागते तेथे आपण पाहिले पाहिजे असाही त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून विचार प्रगट केले आहेत.

  • जिंदगी एक बार मिलती है बिलकुल गलत है सिर्फ मौत एक बार मिलती है जिंदगी हर रोज मिलती है बस तुझको जीना आणा चाहिये आयुष्य रोज एक नवी संधी घेऊन येत असतो. आपल्या समोर पण प्रत्येक दिवस हा वेगळा असतो प्रत्येक पहाट प्रत्येक क्षण प्रत्येक आनंद हा वेगळा असतो आलेल्या दिवसांचे प्रत्येक संधीचे सोने करायचे हे आपल्या हातात आहे. म्हणून क्षणभर आनंदाने भरभरून जगता आलं पाहिजे .हा सकारात्मक दृष्टिकोन आणि सुचण्याचा विचार करणे म्हणजे आयुष्य सुंदर बनवणे हा उद्देश सूचन्याच्या पासवर्ड या पुस्तकातून डॉ. सिताराम कोल्हे यांनी मांडला आहे. सामान्य सूचने आणि ते प्रकल्प सूचन्यातून प्रगतीचा राजमार्ग निर्माण करण्याचा खरा अद्भुत सूत्र म्हणजे पासवर्ड सुचण्याचा
  • सुरेश पवार
  • अध्यक्ष गिरणा गौरव प्रतिष्ठान
  • “””””””””””””

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427