नाशिक जिल्ह्यात शांततेत ६९.१२% मतदान; चुरशीच्या लढतींनी वाढवली उत्कंठा

नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) सरासरी ६९.१२% मतदानाची नोंद झाली. काही किरकोळ वाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात मतदान सुरळीत पार पडले. शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. मतदानाचा शेवटचा टप्पा पार झाल्यानंतरही काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. प्रमुख विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी महत्त्वाचे मुद्दे व […]

मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा -जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असून मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. आज जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांना भेट देऊन तेथील सोयी सुविधांचा […]

सकल मराठा समाजाचा कोणालाही पाठिंबा नाही; जो समाजाच्या हिताचा, त्याला कौल द्या!

नाशिक :- सकल मराठा समाजाने नाशिक येथे झालेल्या बैठकीत एकमुखी निर्णय घेतला की, समाजाचा कोणत्याही गटाला किंवा उमेदवाराला ठरलेला पाठिंबा नाही. समाज सर्वसमावेशक आणि एकसंध आहे. त्यामुळे प्रत्येकाला समाजाच्या हिताचा उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, असे स्पष्ट करण्यात आले. सकल मराठा समाजाचे नेते नाना बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काल-परवा काही गटांनी व्यक्त केलेल्या पाठिंब्याला […]

मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय: अखिल भारतीय मराठा महासंघाचा Adv. माणिकराव शिंदे यांना जाहीर पाठिंबा!

येवला तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाने आगामी विधानसभा निवडणुकीत Adv. माणिकराव शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. महासंघाचे जिल्हा आणि तालुका पातळीवरील पदाधिकारी यांनी स्पष्ट केले की, छगन भुजबळ यांच्या ओबीसी मराठावाद वाढविणाऱ्या भूमिकेला विरोध करत येवला तालुक्यातील समग्र मराठा समाज एकत्र येऊन शिंदे यांना पाठींबा देत आहे. समाजासाठी योगदान:माणिकराव शिंदे यांचे समाजाभिमुख कार्य, शैक्षणिक […]

विधानसभेच्या ६७ वर्षांच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार….

विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार सहभागी आहेत. किती तरी आमदारांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ तर काही उमेदवारांची ही दुसरी, तिसरी, चौथी वेळ असणार आहे. […]

शहरातील १ हजार ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रा.एकबोटे यांच्या जनजागृती गिताचे विमोचन

यवतमाळ : मतदार जनजागृतीसाठी यवतमाळ विधानसभा मतदासंघाच्यावतीने विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी तयार करून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील एक हजार ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी उत्फूर्तपणे सहभागी झाले होते. यवतमाळचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकूल येथे करण्यात आले होते. यावेळी यवतमाळ व […]

जातीयवाद थांबवा, महाराष्ट्राचा विकास साधा : राज ठाकरे

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणावर तीव्र शब्दांत टीका करत, यामुळे राज्याचा विकास थांबल्याचा आरोप केला. सातपूर येथे मनसे उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी जातीयवाद आणि स्वार्थी राजकारणाचा भडिमार करत, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनसेला संधी देण्याचे आवाहन केले. राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणामुळे मूळ […]

महायुतीच्या देवयानी फरांदे यांच्या शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रचारासाठी आयोजित शोभायात्रेला मुंबई नाका येथून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला. माजी नगरसेविका सुमन भालेराव, अर्चना थोरात, तसेच माजी नगरसेवक संदीप लेनकर यांच्या नियोजनाखाली प्रभाग १५ मधील विविध ठिकाणी शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. मतदारांशी थेट […]

शिर्डीत प्रियंका गांधींचा हल्लाबोल; मोदी सरकारवर गंभीर आरोप

शिर्डी :- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीने प्रचारसभांचा धडाका लावला असून, शिर्डीतील सभेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. प्रियंका गांधींनी आपल्या भाषणाला ‘जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘साईबाबाजी की जय’ अशा घोषणांद्वारे सुरुवात केली. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्र ही सामाजिक क्रांतीची भूमी […]

महिला बचत गट मेळाव्यात प्रश्नांना मार्गदर्शन; समीर भुजबळ यांच्या प्रचाराला प्रतिसाद

नाशिक :- देवघट आणि निमगाव येथे झालेल्या महिला बचत गट मेळाव्यात शेकडो महिलांनी सहभाग घेतला. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आयोजित या मेळाव्यात महिलांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. मेळाव्यात महिला सक्षमीकरण, रोजगार, शेतीपूरक उद्योग, मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न यावर मार्गदर्शन करण्यात आले. अभिनेत्री अनुष्का सरकटे, डॉ. शेफाली भुजबळ, आणि अन्य मान्यवरांनी […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427