मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) डॉ. विलास आठवले, अवर सचिव विजय कोमटवार, उपसभापती […]
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात राज्यपाल […]
कसमादे परिसरातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा रब्बी हंगाम निसर्गाच्या अवकाळी कोपाचा प्रतीक ठरला आहे. परतीच्या पावसाने आधीच शेतकऱ्यांच्या कांदा रोपांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीतून सावरून, मोठ्या आर्थिक ताणाखाली शेतकऱ्यांनी नवीन कांदा रोप लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिवाळ्यात अवकाळी पाऊस सुरू झाल्याने दुसऱ्यांदा लावलेले रोपही भक्षस्थानी पडले. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानानंतर ५ डिसेंबर रोजी सकाळपासून […]
नाशिक: सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर निमा इंडेक्स-24 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक प्रदर्शनाचा त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम इस्टेट येथे आज (६ डिसेंबर) मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यास दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, जिंदाल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष व्ही. चंद्रशेखरन आणि अनेक नामांकित उद्योजक व मान्यवर उपस्थित होते. चार दिवस चालणाऱ्या या भव्य […]
नाशिकरोड: गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको महाविद्यालयात शुक्रवारी, ६ डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पार पडलेल्या या सभेत प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. सामुदायिक बुद्धवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या […]
आज, 6 डिसेंबर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भेंडाळा ग्रामपंचायत, जि.प. प्राथमिक शाळा आणि रेणुका अंगणवाडीत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्रामपंचायत उपक्रमाने दिला एकात्मतेचा संदेशकार्यक्रमात ग्रामपंचायत उपसरपंच शरद सुरासे, सदस्य ज्ञानेश्वर सुरासे, सामाजिक कार्यकर्ते मुकुंदा सुरासे, बळी शिंदे, […]
मनमाड शहरातील विवेकानंद नगरसह विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसांत सहा दुचाकी पेटवण्याच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, पोलिसांनी तात्काळ तपास करून सागर जगताप नावाच्या तरुणाला अटक केली आहे. दारूच्या नशेत सागर जगतापने घराबाहेर उभ्या असलेल्या सहा मोटारसायकली पेटवल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. मनमाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल […]
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल सावे, संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, सचिव प्रवीण पुरो, माहिती व […]
उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी घेतली शपथ ऐतिहासिक आझाद मैदानात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शपथविधी मुंबई, दि. ५ : राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. […]
श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क ३० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर कमी केल्याने नाशिकसह देशातील कांदा उत्पादकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे श्रीलंकेत भारतीय कांद्याची निर्यात वाढण्याची शक्यता असून, शेतकरी आणि निर्यातदार यांना चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा आहे. दरवर्षी भारतातून श्रीलंकेत साधारणतः दीड ते दोन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात होतो. मात्र, आयात शुल्कामुळे गेल्या काही […]