google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचा कार्य सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न

author
0 minutes, 10 seconds Read

नाशिक :- जिल्हा मराठी पत्रकार संघ (रजि.) संलग्नित नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूल व ई. वाय. फडोळ ज्यू. कॉलेज येथील शुभेंदू सभागृहात पत्रकार तथा समाजसेवी संस्थांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून खा. हेमंत गोडसे यांनी अध्यक्षीय भाषणात पत्रकारांच्या अडचणी सोडवण्याचे सांगत लोकप्रतिनिधी म्हणून पत्रकारांच्या विविध मागण्या संदर्भात आवाज उचलणार असल्याचे मत मांडले.

व्यासपीठावर पोलिस उपायुक्त श्री किरणकुमार चव्हाण, साने गुरुजी प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण जोशी, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रामसिंग बावरी, जनसंज्ञापन तथा वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रा. श्रीकांत सोनवणे उपस्थित होते.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्या नंतर ज्येष्ठ पत्रकार विश्वास मदाने यांना जीवनगौरव पुरस्काराने करण्यात आले सन्मानित. प्रमुख निमंत्रित पाहुण्यांनी आपापल्या मनोगतात नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्याची स्तुति करून आदर्शवत कार्य उभे केल्याची पावती प्रदान केली.

पत्रकार संघाचे मार्गदर्शक तथा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस श्री दिनेशपंत ठोंबरे यांनी संघाच्या कार्याची पद्धत विषद केली. तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी यांनी प्रस्तावनेत “पत्रकार संघासाठी सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त पत्रकार भवन”ची आवश्यकता असल्याची भावना व्यक्त करताच, श्री प्रवीण जोशी यांनी सर्व पत्रकार बंधुंसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे द्वार सदासर्वदा उघडे असून आम्ही पत्रकार भवन निर्माण करू जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन करून मदतीचा हात पुढे केला. उपस्थित सर्व पत्रकारांनी त्यांच्या विधानाचे स्वागत केले.

यावेळी पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पत्रकार आणि पोलिसांचे नाते नेहमी दृढ राहिले आहे. पत्रकारांची लेखणी सर्वात मोठे अस्त्र असून त्याचा योग्य उपयोग करून जनतेचे प्रश्न मांडले जातात. त्याचा उपयोग आम्हाला गुन्हे शोध घेताना सुद्धा होतो.

याप्रसंगी वृत्त, इलेक्ट्रॉनिक प्रसार तथा विविध डिजिटल ऑनलाईन माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्या ३५ पत्रकार, ५ व्यक्तिगत तथा १० समाजसेवी संस्थांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

गावकरी – सुनील पवार, देशदूत – फारूक पठाण, लोकमत – अजहर शेख, सकाळ – विकास गामने, पुण्यनगरी – ज्ञानेश्वर वाघ, पुढारी – हेमंत घोरपडे, महाराष्ट्र टाइम्स – जितेंद्र तरटे, आपला महानगर – सुधीर उमराळकर, नवराष्ट्र – दीपक कणसे, लोकनामा – धनंजय बोडके, भ्रमर – सुधीर कुलकर्णी, लोकसत्ता – यतिश भानू, प्रहार – कुमार कडलग, दिव्य मराठी – चंदन खतेले, रेडिओ मिरची – भूषण मिटकरी, एबीपी माझा – मयूर बारगजे, झी २४ तास – सोनू भिडे, लोकशाही मराठी – महेश महाले, टीव्ही ९ मराठी – आकाश येवले, पुढारी न्यूज – खुशाल पाटील, दूरदर्शन – भगवान पगारे, सुदर्शन न्युज – भरत गोसावी, आर एन ओ वृत्त संस्था – इसाक कुरेशी, मटा डिजिटल – पवन येवले, लोकमत डिजिटल – किरण नाईक, सन्मान युग – रवींद्र एरंडे, दक्ष न्यूज – अमित कबाडे, नाशिक न्यूज – तुषार ढेपले, वेध न्यूज – कमलाकर तिवेढे, नाईन न्यूज – किशोर बेलसरे, एनसीएन न्यूज – गुलाबराव ताकाटे, जागर जनस्थान – शुभम बोडके पाटील, दिशा न्यूज – उमेश अवणकर, इंडिया दर्पण पोर्टल – गौतम संचेती, लाल दिवा पोर्टल – भगवान थोरात यांचा सन्मान करण्यात आला.

सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती म्हणून श्री. दत्ता शेळके, नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत, डॉ. संदेश बैरागी, श्री. संजोग टिपरे, ऍड. गोरक्षनाथ चौधरी, श्री. दिपक डोके यांना सन्मानित करण्यात आले तर सामाजिक संस्था म्हणून आकाशवाणी केंद्र, शहर गुंडा विरोधी पोलिस पथक, पोलिस मित्र परिवार, समन्वय समिती, महिला विकास, संत गाडगे बाबा सेवाभावी स्वच्छता अभियान, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ, युवा एज्युकेशन अँड वेल्फेअर, ज्ञानोपासना बहुउद्देशीय संस्था, नाशिक गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, छत्रपती सेना संघटन आदी संस्थांचा यथोचित गौरव करण्यात आला.

यशस्वितेसाठी कार्याध्यक्ष लियाकत पठाण, उपाध्यक्ष पंकज पाटील, सुनीता पाटील, सरचिटणीस संजय परदेशी, भैय्यासाहेब कटारे, जनार्दन गायकवाड, विश्वास लचके, तौसिफ शेख, दिनेश पगारे, पल्लवी शेटे आदी पत्रकार संघाच्या सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. प्रास्ताविक अध्यक्ष करणसिंग बावरी, सूत्रसंचालन मंगेश जोशी, शितल भाटे यांनी तर आभार उपाध्यक्ष सुनीता पाटील यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *