google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

इंग्रजी विषयात वडाळी खुर्द शाळेचे मॉडेल संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी दिशादर्शक

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पेलिंग बी स्पर्धेत वडाळी खुर्द शाळेने दुसऱ्या वर्षीही आपला झेंडा फडकवला
खरंतर नाशिक जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या नांदगाव सारखा दुष्काळी तालुक्यातून एका गरीब कुटुंबातील सामान्य घरातील निरक्षर कुटुंबातील विद्यार्थी आदित्य आदेश पवार शाळा वडाळी खुर्द हा नाशिक जिल्ह्यात इंग्रजीच्या स्पर्धेत पहिला आला खरंतर आपल्या गरीब परिस्थितीमुळे आपल्या रोजंदारीवर कुटुंब चालवणाऱ्या मामाच्या घरी शिक्षणासाठी आलेला या विद्यार्थ्याचे यश हे नाशिक जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी निश्चितच दिशादर्शक आदर्श व प्रेरणादायी आहे
या विद्यार्थ्यांच्या यशामागे अतोनात मेहनत घेणारी शाळा, शालेय व्यवस्थापन समिती वडाळी खुर्द, शाळेतील सर्व पालक व विद्यार्थी, ग्रामपंचायत व ग्रामस्थ वडाळी खुर्द, शिक्षण विभाग नांदगाव , कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री प्रमोद चिंचोले साहेब, विस्तार अधिकारी श्रीमती ठोके मॅडम व भालूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मांगीलाल जाधव सर व शाळेचे उपक्रम शिक्षक श्री. राजू घोटेकर सरयांनी मागील ३ वर्षापासून केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे


आज वडाळी शाळेने आपल्या वडाळी गावचेच नाही तर संपूर्ण नांदगाव तालुक्याचे नाव नाशिक जिल्ह्यात मोठे केले अशी प्रतिक्रिया तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय प्रमोद चिंचोले साहेब यांनी दिली
इंग्रजी सारख्या अवघड स्पर्धेत जिल्ह्याच्या टोकाला असलेली दुष्काळी तालुक्यातील, दुष्काळी गावातील शाळा ही खरच नाशिक जिल्ह्यासाठी आदर्श व दिशादर्शक आहे अशीच भावना मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी व्यक्त केली
शिक्षण विभाग पंचायत समिती नांदगाव ने पुन्हा एकदा आदर्श अशी कामगिरी करून नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी आपली मक्तेदारी कायम ठेवली
वडाळी शाळेच्या वडाळी गावाच्या व नांदगाव तालुक्याच्या या यशामागे अहोरात्र मेहनत घेणारे शाळेचे शिक्षक श्री. राजू घोटेकर सर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *