google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

आरक्षणाची मुहूर्तमेढ रवणारे क्रांतीसुर्य कै.अण्णासाहेब पाटील यांच्या वाशी मार्केटमध्ये आरक्षणाचा उधळला गेला गुलाल…

author
0 minutes, 4 seconds Read

एक मराठा, लाख मराठा…#मराठा समाजाला टिकणारे #आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीवर येऊन आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथील शिवाजी चौकात भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता केली. त्यासोबत त्यांना मोसंबीचे ज्यूस पाजून त्यांचे उपोषणही सोडवले. यावेळी मराठीजनांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या कपाळी विजयाचा गुलाल लावला. तसेच पाटील यांनी प्रेमाने भरवलेला पेढा खाऊन तोंड गोड केले.हा विजय हा सकल मराठा समाजाचा आणि त्यासाठी जीवाची बाजी लावून झुंजलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे मत व्यक्त केले. तसेच गेले सात दिवस कोणतेही गालबोट लागू न देता अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सकल मराठा समाजाचे कौतुक आणि अभिनंदन केले. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या असून कुणबी नोंदी शोधताना सगेसोयऱ्यांचा देखील त्यात समावेश करण्यात येणार आहे. यासोबतच शिंदे समितीला मुदतवाढ द्यायला मान्यता दिली. तसेच मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत देखील तयारी दर्शवली. यासोबतच मराठा आंदोलनात जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांना देखील नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. हा विजय मराठा समाजाचा असून गुलाल उधळून आनंद साजरा करावा सरकार आपल्यासोबत असल्याचे आवाहन सकल मराठा समाजाला केले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, आमदार संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.#Maratha #MarathaReservation #MarathaArakshan #EknathShindeGirish Mahajan Mangal Prabhat Lodha Deepak Vasant Kesarkar Sanjay Shirsat – संजय शिरसाट Mangesh Chivate

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *