google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

सावरपाडा एक्सप्रेस म्हणून फेमस असणाऱ्या कविता राउतच्या पुतळ्याचे अनावरण…

author
0 minutes, 1 second Read

नाशिक :- नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्‍तरावर झळकविणार्या ऑलिम्‍पिकपटू कविता राउत-तुंगार हिचा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकात उभारण्यात आलेल्या.  पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री दादा भुसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसियशन महा सचिव नामदेवराव शिवसागर म वी प्र चें सरचिटणीस adv नितीन ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.  सावरपाडा एक्‍स्‍प्रेस’ म्‍हणून नावलौकिक मिळविलेल्‍या कविता राऊत-तुंगार हिने आजवर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्‍पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे. २०१६ मध्ये झालेल्‍या रिओ ऑलिम्‍पिकमध्ये मॅरेथॉन या गटातून तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. आदिवासीबहुल भागातील सावरपाडा या छोट्याशा पाड्यातून आलेल्‍या कविताने क्रीडा क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. तिच्‍या जीवनप्रवासाचा यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या अभ्यासक्रमात समावेश केला. तिच्‍या कार्यकर्तृत्वाची प्रेरणा युवा पिढीला मिळावी, या उद्देशाने ‘मविप्र’ संस्‍थेतर्फे कविता राऊत-तुंगार हिचा पुतळा मविप्र मॅरेथॉन चौकात उभारन्यात आला आहे असे प्रतिपादन मविप्र चे सरचिटणीस adv नितीन ठाकरे यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *