google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

आयुक्त कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिलांच्या हस्ते महिलांचा सन्मान…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक शहर वृत्त :- नाशिक शहर पोलीस आयुक्तालया तर्फे 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती एक अनोखा उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलीस आयुक्तालय येथे महिलांच्या हस्ते महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना बहाल केलेला शिक्षणाचा हक्क आणि त्यातून आजच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरणारी स्त्री यामध्ये राजकीय,शैक्षणिक, सामाजिक, विधी महसूल, आरोग्य स्वच्छता त्याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रातील महिलांच्या ही सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या त्याचबरोबर पोलीस आयुक्तालय हद्दीत काम करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांचाही यामध्ये सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सौ. प्रिया कर्णिक जिल्हा परिषद सीईओ अशिमा मित्तल, शाहिस्ता मुजुमदार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत विविध क्षेत्रातून आलेल्या महिला मान्यवर पोलीस अधिकारी कर्मचारी महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सावित्रीच्या लेकींचा सन्मान असल्याचं सांगत आलेल्या सर्वच मान्यवर महिलांचा एकमेकींच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान सोहळ्याचे आयोजन केलं या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उपस्थित असलेल्या महिलांनी एकमेकींना गुलाबपुष्प देऊन आपल्या कार्याचं कौतुक करण्यात आले यावेळी सीईओ अश्रमा मित्तल यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रिया कर्णिक यांचे आभार मानत मार्गदर्शन केले. इथे त्याचबरोबर शाहिस्ता मुजुमदार यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व प्रिया कर्णिक यांच्या बद्दल बोलताना महात्मा ज्योतिराव फुले तसेच सावित्रीबाई फुले यांची उपमातेत स्त्रियांच्या केलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले…..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *