google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

जालना शहरातील गणपती नेत्रालय समोर जबरी चोरी करणारा गुन्हेगार सहा तासात जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

author
0 minutes, 0 seconds Read

जालना वृत्त:- जालना शहरात दिनांक 29/12/2023 पहाटे सहा वाजता गणपती नेत्रालय येथे उपचार कामी आलेल्या इसमास दोन अज्ञात आरोपीतांनी चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील रोख रक्कम व मोबाईल जबरीने चोरी केले प्रकरणी पोलीस ठाणे सदरबाजार जालना येथे गुन्हा दाखल झाला. सदर चा गुन्हा उघडकीस आणणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.त्यानुषंगाने दिनांक 29/12/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नमुद गुन्ह्यातील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे मोहम्मद सिद्दिक मोहम्मद कौसर रा. पेंशनपुरा, जालना याने त्याचे साथीदार याचेसह केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार मोहम्मद सिद्दिक मोहम्मद कौसर रा. पेंशनपुरा, जालना याचा शोध घेऊन त्याचेकडुन सदरचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमालासह एकुण रु.40120/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर प्रकरणात पोलीस ठाणे सदर बाजार येथे गुरनं. 1157/2023 कलम 392,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. तरी नमुद आरोपीस पुढील तपासकामी सदर बाजार जालना यांच्या ताब्यात दिले आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ, पोउपनि श्री. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडधे, सचिन चौधरी, सुधिर वाघमारे, फुलचंद गव्हाणे, प्रशांत लोखंडे, दत्तात्रय वाघुंडे, धिरज भोसले, योगेश सहाने, कैलास चेके सर्व स्था.गु.शा. जालना व विनायक कोकणे, पो.मु., जालना यांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *