google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

राज्य सरकारचा वेळकाढूपणा ही मराठा समाजाची धादान्त फसवणूकच…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिकच्या उपोषण कर्त्यांची प्रतिक्रिया.

मराठ्यांचे ओबीसीकरण हिच मूळ मागणी,त्यात तडजोड नाही.

नाशिक :- राज्यसरकारने वारंवार आरक्षणासाठी वेळकाढूपणा केला आहे.मराठा आरक्षणाचे लाखोंचे प्राचीन संदर्भ 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्या असतांना केवळ वेळकाढूपणा काढुन राज्य सरकार मुद्दामहून मराठा समाजाला फसवत आहेत याबद्दल गरजवंत मराठयांमध्ये संताप आहे.नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या 99 दिवसापासून अखंडित सुरु असलेल्या साखळी उपोषणकर्त्यांनी याबाबतीत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून मराठा क्रांतियोद्धा मनोजराव जरागे पाटिल यांच्या विचारानेच मराठा आरक्षण मिळेल,सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण हीच समस्त गरजवंत मराठ्यांची अंतिम मागणी आहे.मात्र 24 डिसेंबर ही मराठा समाजाकडून राज्यसरकारने घेतलेली वेळ असून सरकार पुन्हा यातून पळवाट काढीत आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात स्वतंत्र मराठा आरक्षणासाठी विधिमंडळ भरवण्याची केलेली घोषणा ही मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचा प्रकार आहे अशीच समाजात चर्चा असल्याने मराठा समाज राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात कमालीचा नाराज आहे,राज्य सरकार मराठयांना आरक्षण देण्यास करित असलेला कसूरच आहे असा एकून समज झाला आहे आता सरकारने गांभीर्याने घ्यावे असे विचार नाशिकच्या मराठा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

  मराठा आंदोलनकर्ते नाना बच्छाव यांनी सांगितले की,राज्यातील मराठा समाज गेल्या 40 वर्षे मराठा आरक्षणाचा लढा अविरतपणे सुरु आहे, मात्र मराठ्यांचे हक्काचे आरक्षण अनेक वर्षे दाबून ठेवले होते, तसेच आजपावेतो मराठा समाजाचे 55 लाख कुणबी दाखले दडपून ठेवणारे कोण? हाही सवाल आहे, मात्र मनोज जरागे पाटिल यांच्या रूपाने मराठा समाजाला मिळालेलं त्यागी नेतृत्व आता मराठा समाजाचा एकमेव आधार आहे.त्यांचेमुळं मराठ्यांच्या आरक्षणाला बळ मिळाले आहे. मराठा समाजाचे ओबीसीकरण हीच अंतिम मागणी आहे. त्यासाठी अखेरपर्यंत मराठ्यांचा लढा कायम राहिलं, वारंवार राज्य सरकारने मनोज जरागे पाटिल यांच्या उपोषणावेळी वेळ मागवून घेतला, मात्र आतां लाखों नोंदी संदर्भ असतांना मराठा आरक्षण सरकारची इच्छा दिसत नाहीं.यामुळे समाजात तीव्र संताप असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

           नाशिकच्या सकल मराठा समाजाचे नाशिकच्या शिवतीर्थवर गेल्या 99 दिवसापासून साखळी उपोषण सुरु आहे.या साखळी उपोषण कर्त्यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरागे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार सकल मराठा समाज आंदोलनात सक्रिय राहिलं असे यावेळी ठरवन्यात आले.

यावेळी
उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी दिली.

मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण मिळावे यासाठी नाशिकच्या शिवतीर्थावर ९१ दिवसापासून अखंडित मराठा साखळी उपोषण सुरू आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील आंतरवेल सराटीच्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण व सभेद्वारे महाराष्ट्रातील लाखोंच्या कोट्यवधी मराठ्यांच्या सभेद्वारे आधीच ओबीसीतील मराठ्यांचे आरक्षण दाबून मराठा समाजाला देशोधडीला लावण्याचा प्रकार हाणून पाडण्यासाठी उपोषणे सभा सुरू आहे.राज्य सरकारला २४ डिसेंम्बर पर्यंत आरक्षण द्या नाहीतर मुंबईत चक्काजाम साठी कोटी मराठा धडकणार या नियोजनासाठी १७ डिसेंम्बरला राज्यातील मराठा आंदोलकांची एकत्रित बैठक होणार आहे.
शेतकरी कुटुंबातील मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार आंतरवेल सराटीला १७ डिसेंम्बरला नाशिक जिल्ह्यातील उपोषण कर्ते मोठ्या संख्येने जाणार आहे.दरम्यान नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यातील विविध गावांत,तालुक्यातील उपोषण कर्ते ही आंतरवेल सराटीला जाणार आहे,जिल्ह्यातील हजारो उपोषण कर्ते मराठवाड्याकडे जाणार आहे,

नाना बच्छाव-
मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा अंतिम स्थितीत आहे.सरसकट मराठा समाजाचे ओबीसीकरण हीच एकमेव मागणी मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांची समस्त मराठ्यांची आहे,मात्र सरकार पुरस्कृत मंत्री आमदार खासदार यांना मराठ्यांच्या अरक्षणापेक्षा ओबीसी मत गठ्ठ्याचे पडले असल्याने मूळ मागणी बाजूला सारण्याचे षडयंत्र ओबीसी नेत्यांची हुजरेगिरी सुरू आहे.मात्र ३६ लाखांपेक्षा अधिक पुरावे हेच मराठा आरक्षणासाठी मूळ कायदेशीर आधार आहे,मात्र पुरावे नसलेले मराठा समाजाला ही सरसकट आरक्षण ओबीसी मधून यासाठी आता निर्वाणीचा लढा होईल,सरकारने मराठा समाजाचा अंत बघू नये,अन्यथा केंद्र राज्य सरकारला पेलवणार झेपणार नाही,

अशी माहिती सकल मराठा समाजाच्या नाशिकच्या साखळी उपोषणातून उपोषणकर्ते नाना बच्छाव,चंद्रकांत बनकर,ऍड कैलास खांडबहाले,नितीन रोटे पाटील,संजय फडोळ, रांम खुर्दळ,अण्णा पिंपळे,नितीन डांगे पाटील,प्रफुल्ल वाघ,सुधीर पौल,हिरामण नाना वाघ,
निलेश ठुबे,विकी गायधनी,शरद अण्णा लभडे,श्रीराम निकम,विकी देशमुख,संदीप खुटे पाटील,योगेश नाटकर,योगेश कापसे,राम गहिरे,सुधाकर चांदवडे,अनिल आहेर, प्रकाश आहेर,संजय पांगारे,संदीप ब-हे,सचिन पवार,गौरव गांजरे,अरुण पळसकर,सचिन पवार,रविंद्र बोचरे,अरुण मोरे,निलेश शिरसाठ,ज्ञानेश्वर शिंदे,तानाजी आरोटे,ज्ञानेश्वर सुरासे,सागर वाबळे,सुभाष शेळके,ऍड रामनाथ गुळवे, संदीप हाण्डगे,डॉ संदीप देवरे,डॉ तिदमे,गौरव गाजरे,रोहिणी उखाडे,स्वाती कदम,ऍड शिल्पा चव्हाण,ऍड शीतल भोसले,ममता शिंदे,एकताताई खैरे,ऍड स्वप्ना राऊत,वंदना पाटील,मंगलाताई शिंदे,सुमन महाले,रोहिणी दळवी,माधवी पाटील,ऍड स्वप्ना राऊत,मनीषा जाधव,रविंद्र बोचरे,नितीन खैरनार,इंगळे बाबा,विकास रसाळ,अरुण कळसकर,गणेश पाटील,ज्ञानेश्वर कवडे,देवकरसर,भास्कर पाटील,मंगेश पाटील यासह अनेकजण उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *