बहुचर्चित एमडी प्रकरण : शिवाजी शिंदे याचाही मुक्काम वाढला…

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- भूषण, अभिषेकला सात दिवसांची पोलिस कोठडी बहुचर्चित ड्रग्जमाफिया ललित पानपाटील याचा भाऊ संशयित मास्टरमाइंड भूषण पानपाटील व त्याचा ‘खजिनदार’ अभिषेक बलकवडे या दोघांचा ताबा नाशिक पोलिसांनी पुणे पोलिसांकडून मंगळवारी घेतला. बुधवारी (दि.६) जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने हजर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.यू मोरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यांनी दोघांना येत्या बुधवारपर्यंत (दि.१३) तर त्यांचा साथीदार संशयित शिवाजी शिंदे यास शनिवारपर्यंत (दि.९) पोलिस कोठडी सुनावली.

दोन महिन्यांपूर्वी गावात नाशिकरोड पोलिसांनी धाड टाकून एक गोदाम उद्ध्वस्त केले होते. या गोदामातून एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा साठा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हस्तगत केला होता. हे गोदाम संशयित ड्रग्जमाफिया ललित पानपाटील याचे की त्याचा भाऊ संशयित भूषण पानपाटलाचे?, असा प्रश्न कायम होता. यासाठी नाशिक पोलिसांना संशयित शिवाजी शिंदेसह भूषण व अभिषेक यांचाही ताबा मिळण्याची प्रतीक्षा होती. कारण त्यांच्या
चौकशीनंतरच या गुन्ह्याच्या तपासाला वेग देता येणार आहे. मुंबई पोलिसांकडून शिंदेचा ताबा घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर पुणे पोलिसांकडून भूषण व

अभिषेक यांचाही ताबा पोलिसांनी घेतला. शिंदेची पोलिस कोठडी बुधवारी (दि.६) संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यास पुन्हा तीन

दिवसांच्या कोठडीत वाढ करण्यात आली. तसेच पुढील चौकशीकरिता भूषण व अभिषेक यांच्या कोठडीची मागणी सरकार पक्षाकडून अॅड. देवरे यांनी केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *