नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा उपक्रम
नाशिक : येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीएच्यावतीने, आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त, संघटनेच्या विस्तारीकरण व नुतनीकरण झालेल्या कार्यालयाचे उद्घाटन आणि शहर व जिल्ह्यातील जवळपास पस्तीस यशस्वी कोचिंग क्लासेस संचालकांच्या आईवडिलांना ” कृतार्थ पुरस्कार ” प्रदान करुन गौरव करण्यात आला. रोटरी क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत व सपकाळ नॉलेज हबचे प्राचार्य डॉ साहेबराव बागल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी प्रास्ताविक केले तर अशोक देशपांडे, प्रतिभा देवरे, लिना ठाकरे यांनी सुत्रसंचलन केले. रोटरी हॉल येथे झालेल्या या सोहळ्याला संघटनेचे सरचिटणीस पवन जोशी, खजिनदार रविंद्र पाटील, उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, कैलास खताळे, अरुण कुशारे, विवेक भोर, किशोर सपकाळे, विद्या राकडे, लोकेश पारख, इम्रान पटेल, प्रवीण गडाख, संतोष बत्तीसे, अर्जुन शिंदे, प्रमोद गुप्ता, जयवंत जाधव, गणेश कोतकर, सुनील आहेर, सुनील सोलंकी, निलेश दूसे, विष्णू चव्हाण, सचिन अपसुंदे, विक्रमराजे गोसावी, विक्रांत राजगुरू, दुर्गेश तिवारी, अमीन शाह, आकाश लोहकरे, गणेश पवार, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अवयव दानाविषयी प्रीती देवरे दिग्दर्शित ” आर्जव ” नाटिका सादर करण्यात आली तर नंदकुमार देशपांडे यांनी गीते सादर केली.
यांचा झाला सन्मान ……
माधव जयराम मोरे, लतिका माधव मोरे, ताराबाई यशवंत कदम, सुधाकर यशवंत बुचके, सुचिता सुधाकर बुचके, माधवी मधुकर कोराण्णे, सुनंदा श्रीराम जोशी, नंदकुमार दुसानीस, रंजना नंदकुमार दुसानीस, हेमराज राका, लता हेमराज राका, शिवाजीराव गडाख, सुनीता शिवाजीराव गडाख, मंदा बारकु साबळे, मंगला विश्वास माळी, यमुनाबाई भिमराव अहिरे, लक्ष्मण नामदेव खताळे, पुंजाबाई लक्ष्मण खताळे, गोपाळ सखाराम मोरे, शोभा गोपाळ मोरे, लता राजगुरू, रेखा विसपुते, जयप्रकाश तिवारी, मंजु जयप्रकाश तिवारी, विमल नारायण सुर्यवंशी, चिंधाबाई विठ्ठल राकडे, कमल प्रकाश उबाळे, संजय दामोदर खैरे, अर्चना संजय खैरे, प्रभाकर बाळकृष्ण कदम, सुशिला प्रभाकर कदम, शंकर गणपत पानस्कर, शकुंतला शंकर पानस्कर, प्रकाश रामकृष्ण विसपुते, चंद्रकला प्रकाश विसपुते, अनुराधा भरत रनाळकर, विश्वास यशवंत भट, लक्ष्मण परघरमोल, माधुरी लक्ष्मण परघरमोल, लॉरेन्स ॲन्थोनी सरदार, सीमा प्रकाश सोनार, प्रमिला रामदास विसपुते, अंजना अरुण वाळे, अरुण त्रिंबक वाळे, रंजना किसन साळुंके, कमलबाई अशोक बत्तीसे, महादेव लक्ष्मण खोंपी, रेणुका महादेव खोंपीमुक्ता वसंत बोडके, रघुनाथ नामदेव दिघोळे, सुमन रघुनाथ दिघोळे, संजय भामरे, सुनिता संजय भामरे, प्रमोद सुर्यकांत म्हाळणकर, उषा प्रमोद म्हाळणकर, अलका सुभाष विसरकर, सुषमा रमेश देवरे आदी ज्येष्ठ नागरिकांना यावेळी सन्मानित करण्यात आला.