कोकण :- ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र, पुणे यांच्या वास्तु विशारद बॅच क्रमांक 15 च्या विद्यार्थ्यांनी 30 व 31 ऑगस्ट रोजी कोकणातील श्रीहरीहरेश्वर येथे वास्तुशास्त्र अभ्यास दौरा आयोजित केला. कोकणच्या निळाशुभ्र समुद्र, फेसलेल्या लाटा, हिरवेगार झाडं, आणि शांततापूर्ण वातावरणात हा अभ्यास दौरा संपन्न झाला.
पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, रत्नागिरी, परभणी अशा विविध ठिकाणांहून आलेल्या विद्यार्थ्यांनी ओम प्रकाश कोथळकर यांच्या “ओम श्री होम” मध्ये वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन घेतलं. वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजींच्या आगमनाने हा परिसर भक्तीमय झाला होता.
गुरुजींनी श्री हरिहरेश्वर मंदिर, कालभैरव दर्शन, आणि त्रिलिंग शिवलिंग अभिषेकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यात्मिक व वास्तुशास्त्रीय मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
वास्तुशास्त्रातील तत्त्वांनुसार गुरुजींनी वास्तु परीक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. शेवटी, सर्वांनी कोकणातील रुचकर आहाराचा आस्वाद घेतला आणि श्रीहरीहरेश्वराच्या पवित्र स्थानाचा निरोप घेतला.
हृदयाचा दरवाजा उघडा ठेवा, कारण तिथे नाती आश्रय घेतात!
— श्री रमेश मुसूडगे (पत्रकार व वास्तू अभ्यासक)