“गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः”
नाशिक :- शिक्षक दिनाच्या निमित्ताने, नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक आणि श्रीराम आय क्लिनिक डॉक्टर अर्पित शहा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय, उंटवाडी, त्रिमूर्ती चौक येथे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये ५० हून अधिक शिक्षक, कर्मचारी, व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आणि तपासणीचा लाभ घेतला.
शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अर्पित शहा यांनी उपस्थितांना नेत्र आरोग्याचे महत्त्व समजावले. यावेळी पालक शिक्षक संघ तर्फे सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव यांनी ग्रामीण भागात आणि गरजूंसाठी अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्याचे मनोदय व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी भूषवले तर, प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध गायिका मृदुला देव उपस्थित होत्या. शिबिरात सहभागी शिक्षकांना शुभेच्छा देतांना मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री लचके यांनी केले. प्रविण जाधव यांनी प्रास्ताविक केले आणि दिलीप चव्हाण यांनी आभार मानले.