वन नेशन-वन इलेक्शन निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जोरदार स्वागत

मुंबई – वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक प्रक्रिया या संकल्पनेमुळे आणखी प्रभावी आणि मतदारांसाठी सोयीची ठरेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात एक देश-एक निवडणूक या संकल्पनेला मंजूरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी […]

एसटी बस प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांशी संपर्क करण्याची सुविधा

मुंबई : एसटी बस प्रवासातील समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एसटी प्रशासनाने नवीन यंत्रणा सुरू केली आहे. प्रवासादरम्यान कोणत्याही अडचणीसाठी प्रवाशांना थेट आगार प्रमुखांना फोन करून संपर्क साधता येणार आहे. आता प्रत्येक एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित आगाराचे प्रमुख, स्थानक प्रमुख, आणि कार्यशाळा अधीक्षक यांचे दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित केले जातील. हे क्रमांक बसमध्ये दिलेल्या सूचनांसोबत […]

धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा सकारात्मक प्रयत्न

मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, असे प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे  यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय […]

शेलार कुटुंबीयांकडून ‘अज्ञान’ या विषयावर आधारित गणेशोत्सवाची अनोखी आरास: समाजातील गैरसमजांवर प्रकाश

कल्याण :- शेलार कुटुंबीयांनी यंदाच्या गणेशोत्सवात अनोख्या संकल्पनेतून ‘अज्ञान’ या विषयावर आधारित आरास साकारली आहे. प्रत्येक वर्षी एक सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने गणपतीची आरास करणाऱ्या शेलार कुटुंबीयांनी यंदा लैंगिक शिक्षण, मासिक पाळी, वैज्ञानिक अज्ञान आणि शास्त्रीय अज्ञान यासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक मुद्द्यांवर जनजागृती करण्याचा उद्देश ठेवला आहे. आरासमधून त्यांनी समाजातील विविध प्रकारच्या अज्ञानावर प्रकाश टाकला आहे. […]

एसटी कर्मचाऱ्यांचा संप: सणासुदीच्या काळात प्रवाशांची तारांबळ

मुंबई: ऐन सणासुदीच्या काळात, गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विविध प्रलंबित मागण्या मान्य न केल्याच्या निषेधार्थ एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला असून, राज्यभरातील एसटी बस डेपो बंद असल्यामुळे प्रवासी ठप्प झाले आहेत. एसटी कर्मचारी संघटनांनी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, यासह आर्थिक बाबी […]

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला केंद्राचा ग्रीन सिग्नल | 30 नवीन स्थानकं | 1 हजार गावांना लाभ | 18 हजार कोटींचा निधी मंजूर

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ताज्या बैठकीत, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील सुमारे 1,000 गावांना थेट फायदा होणार आहे. मनमाड ते इंदूर या 309 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावर 30 नवीन स्थानकांचे निर्माण होईल. उद्योगक्षेत्राला प्रोत्साहन हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली

मुंबई :- जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले लोकाभिमुख नेतृत्व खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, जनतेच्या आशा आकांक्षांशी समरस झालेले नेतृत्व म्हणून खासदार चव्हाण यांची ओळख कायम राहील. नायगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, विधिमंडळातील […]

शिर्डी येथे होणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य शिखर अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

मुंबई (प्रतिनिधी) : जगातल्या पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रातील पत्रकारांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांसाठी उभ्या केलेल्या संघटनेचा आम्हाला अभिमान वाटतो. ही संघटना केवळ देशपातळीवरच नव्हे, तर विदेशातही ४३ देशांत आपल्या कामाच्या माध्यमांतून सर्वाना परिचयाची झाली आहे. व्हॉईस ऑफ मिडीयाची पाच वर्षांतील वाटचाल देदीप्यमान आणि अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.येत्या […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427