संविधान कराओके क्लबच्या दिवाळी पाडवा पहाट मैफिलीने नाशिकरोडमध्ये रसिकांची मनं जिंकली

नाशिकरोडच्या आनंद उत्तम मित्र परिवाराच्या आयोजनात संविधान कराओके ग्रुप प्रस्तुत दिवाळी पाडव्यानिमित्त “सदाबहार सुमधुर मराठी-हिंदी गीतांची संगीतमय पहाट” या कार्यक्रमाने रसिकांना संगीताच्या सुरेल दुनियेत हरवून टाकले. विकास मंदिर शाळा, दत्तमंदिर रोड येथे झालेल्या या मैफिलीत, संविधान ग्रुपच्या कलाकारांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक अप्रतिम गीतांनी वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमात उत्तम जाधव, मायकल खरात, रुपाली तायडे, मीना […]

राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्या जावई समीर खान यांचे निधन..

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर समीर खान यांच्यावर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवाब मलिक यांनी सोशल मिडिया (एक्स) अकाऊंटवरून ही दुःखद माहिती दिली […]

दिवाळीत महागाईचा फटका: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, विमान प्रवास महागण्याची शक्यता

दिवाळीच्या सणात नागरिकांच्या खिशाला महागाईचा झटका बसला आहे. आजपासून (१ नोव्हेंबर) तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळात अनेक व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांवरही आर्थिक भार वाढणार आहे. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरामुळे देशभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यवसायांवर परिणाम होणार आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत १५६ रुपये, तर […]

छाननीनंतर २८७ मतदारसंघात ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.29 ऑक्टोबर 2024 रोजीपर्यंत राज्यातील 288 मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत 7 हजार 995 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची दि. 30 ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली. राज्यातील 287 मतदारसंघातील एकूण 7 हजार 967 उमेदवारांपैकी 7 हजार 050 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर 917 […]

राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी ७९९५ उमेदवारांचे १०,९०५ अर्ज दाखल

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आज नामनिर्देशन […]

महायुती आणि महाविकास आघाडीची भव्य रॅली, उमेदवारांचा दमदार प्रचार सुरू

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बिगुलानंतर नाशिकमधील महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज नाशिकच्या विविध मतदारसंघांमध्ये राजकीय उर्जा दिसून आली, जिथे रॅली, कार्यकर्त्यांचा जोश, आणि पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था लक्षवेधी ठरली. नाशिक मध्य मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल भाजपच्या महायुतीकडून नाशिक मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे यांनी अशोक […]

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ५४ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा वळण रस्ता, येथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर आणि सहकार नगर, लिंक रोड, चेंबूर, मुंबई या ठिकाणी परराज्यात निर्मित असलेला भांग मिश्रीत पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर 26 ऑक्टोबर रोजी कारवाई केली. यामध्ये चेंबूर येथील कारवाईत 5 व मुंब्रा येथील कारवाईमध्ये 2 […]

नाशिक ‘मध्य’मध्ये थेट मुकाबला: फरांदे-विरुद्ध-गीते;

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीच्या देवयानी फरांदे आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार वसंत गिते यांच्यात थेट लढत रंगली आहे. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत नाव नसल्यामुळे देवयानी फरांदे यांनी मुंबई गाठून शक्तिप्रदर्शन केले होते. अखेर दुसऱ्या यादीत त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे […]

नाशिक ‘मध्य’ची जागा काँग्रेससाठी हवीच; काँग्रेसचा ठाकरे गटाच्या विरोधात ‘राजीनामा’ स्ट्राइक

नाशिकच्या ‘मध्य’ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता जागेच्या हक्कासाठी जोरदार आक्रमक झाले आहेत. खेळाच्या मैदानावर क्रिकेटप्रमाणेच राजकीय डावपेचांचा खेळ चालू असताना, काँग्रेसने आपल्या परंपरागत मतदारसंघावर दावा कायम राखण्याची मागणी जोरकसपणे मांडली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, नाशिक शहरातील तीन मतदारसंघांपैकी ‘नाशिक मध्य’ हा पारंपरिक काँग्रेसचा गड आहे. […]

भिवंडीत संशयित वाहनाची भरारी पथक व पोलिसांकडून तपासणी

ठाणे :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. १३६ भिवंडी पश्चिम येथे भरारी पथक व नारपोली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये रू. ३ लाख ३१ हजार ६०९/- चा मुद्देमाल विनातपशील आढळला असून ज्यात चांदी व चांदीचे काम असलेल्या वस्तूंची बिले तपासणीदरम्यान सादर न केल्याने भरारी पथकामार्फत धडक […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427