google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मराठा वधु वर परिचय मेळावा भावबंधन मंगल कार्यालयात संपन्न

author
0 minutes, 0 seconds Read

वधू वर संशोधन सूची पुस्तिका प्रकाशन सोहळा

आपला महाराष्ट्र वृत्त:- नाशिक जिल्हा मराठा समाज उत्कर्ष संस्थेच्या वतीने विवाह इच्छुक मुला मुलींचा तसेच पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या स्त्री पुरुषांचा परिचय मेळावा आणि वधू वर संशोधन सूची पुस्तिका प्रकाशन सोहळा, भावबंधन मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून द्वीप प्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे आणि मान्यवरांच्या हस्ते वधू-वर संशोधन सूची पुस्तके चे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की लग्न जुळवितांना आजकाल बरेच प्रयत्न व संघर्ष करावे लागतात, तसेच मुलामुलींच्या अपेक्षा वाढल्यामुळे लवकर लग्न जमत नाही, तसेच वय वाढत जाऊन नंतर तडजोड करावी लागते, तर ही तडजोड वेळीच केली तर फारशी अडचण येत नाही. सुमारे 800 विवाह ईच्छुक मुलामुलींचे फोटो आणि बायोडाटा यांचा समावेश असलेल्या पुस्तिकेतून एकाच ठिकाणी अनेक स्थळे बघता येतील अशी सोय मराठा समाज उत्कर्ष संस्थेने, अनेक विवाह ईच्छुकांचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. संस्थेचे सल्लागार समिती अध्यक्ष श्री. हरिश्चंद्र शेलार यांनी प्रमुख पाहुणे श्री. नितीन ठाकरे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून आभार मानले. सदर मेळाव्यास प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या उपस्थितीत समस्त मुला मुलींचे परिचय सत्र पार पडले. मेळाव्यास साधारण 600 ते 650 पालक, आणि विवाह ईच्छुक मुले मुली तसेच समाजबांधव उपस्थित होते. मेळाव्यात 122 मुलींनी आणि 165 मुलांनी आपले नाव नोंदणी केले. यावेळी सूची पुस्तकांचे वाटपही करण्यात आले. यावेळी मुलीपेक्षा मुलांची उपस्थिती जास्त होती कार्यक्रमाचे सुत्र-संचालन श्री अरुण पळसकर आणि डी. एल. जाधव यांनी केले. याप्रसंगी सर्वश्री जेष्ठ सल्लागार हरिभाऊ शेलार, नगरसेवक मधुकरशेठ जाधव, निवृत्त पोलीस अधिकारी रमेश पाटील, ॲड. शिवाजीराव जाधव, बाळासाहेब शिवले पाटील, हिरामण वाघ, अरुण मोरे, नानासाहेब जगताप, दत्तात्रय कोरडे, बाजीराव कदम, दत्तात्रय कदम, योगेश शिंदे, शामकांत पाटील, सोपान गांगुर्डे, रमेश पवार, शिवाजी भुंजगे, अरुण भवर, नाना पळसकर, रमेश पाटील, दिपक जाधव, इत्यादी उपस्थित होते. नोंदणी व्यवस्था आणि वधू वर संशोधन सूची पुस्तिका वितरण या कामी सर्वश्री. काका ढोमसे, अंबादास संधान. समीर भांगरे, रमेश पाटील आणि सौ. रोहिणी ढोबळे यांनी काम पहिले.शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *