google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

तहानलेल्या वन्यजीव,पक्षांसाठी श्रमदानातुन रामगंगेत पाणवठे.

author
0 minutes, 0 seconds Read

शिवकार्य गडकोट व दऱ्यादेवी वृक्षमित्र परिवाराचे श्रमदान,

नाशिक :- डोंगर दऱ्यातील आटलेल्या नदीनाल्यातील घळीत,पात्रात आजूबाजूच्या तहानलेल्या वन्यजीव व पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या हेतूने नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था व दऱ्याई माता वृक्षमित्र परिवारावतीने भर उन्हात श्रमदानातुन पानवठे तयार करण्यात आले. दिवसभरात सहा ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले. यंदा पावसाचे प्रमाण कमालीचे घटले, परिणामी धरणे,डॅम,तलाव, नद्या यातील पाणी पातळी ऐन जानेवारी पासूनच घटली आहे.मार्च अखेर पर्यंत वाहणाऱ्या नद्या ही ऐन डिसेंबर नंतर कोरड्या ठाक पडल्या आहेत. त्यामुळं यंदा पिण्याच्या पाण्याबरोबर वन्यजीव, पक्षी व पर्यावरणासाठी पाण्याची वनवा आहे. अश्यात थंड हवेचे नाशिक आता वाढती उष्णत्यामुळे तापले आहे.त्यातून मार्ग शोधून नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे दुर्ग अभ्यासक तथा जलसंवर्धक राम खुर्दळ यांच्या संकल्पनेतून गत वर्षी हरसूल घाटात वन्यजीव पक्षांसाठी डोंगर घळीतुन थेंब थेंब टिपकणारे पाणी,खडकातुन बारीक वाहणारे पाणी अडवून श्रमदानातून पाणवठे तयार करण्यात आले होते, यंदा ही ऐन पाणी टंचाईत नाशिकच्या dari-मातोरी भागातील दऱ्याई माता पर्यावरण व पर्यटन स्थळी रामशेजवरून वाहत येणाऱ्या रामगंगा नदीवर वन्यजीव पक्षांसाठी पाणवठे तयार करण्यात आले.

या भर उन्हात झालेल्या मोहिमेत शिवकार्य गडकोटचे संस्थापक राम खुर्दळ,दऱ्याई माता वृक्षमित्र परिवारातील भारत पिंगळे,वृक्षअभ्यासक शिवाजी धोंगडे, वृक्षमित्र पत्रकार जितेंद्र साठे यांनी श्रमदानातं सहभाग घेतला.चौकट ::राम खुर्दळ (दुर्ग तथा जलसंवर्धक) यंदा नाशिकच्या उत्तर व पश्चिम भागात घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात वनवे लागले, पाऊस कमी असल्याने जलाशये आटली त्यामुळं वन्यजीव पक्षांची ससेहोळपट झाली, ते विस्तापित होत आहेत. याबद्दल गांभीर्य लक्ष्यात घेऊन डोंगर,घाट, नदीतील झिरपणारे पाणी पानवठे करुण अडवले, जिरवले,अधिक पाणी काढून दिले तर आडलेल्या पाण्यात पक्षी वन्यजीव पाणी पिऊन तृप्त होतील यासाठी श्रमदानातुन पाणवठे आम्ही करीत आहोत, पुढील आठवड्यात रविवारी हरसूल घाटात हाच उपक्रम पुन्हा आहे,फोटो ::रामगंगे च्या कोरड्या पात्रात श्रमदानातून पाणवठे साकारताना दुर्ग व वृक्ष संवर्धक आपला :: राम खुर्दळ, 9423055801

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *