google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

वाढत्या वनव्यात वन,पर्यावरणाची राखरांगोळी थांबेल का?

author
0 minutes, 1 second Read

वनव्यात रामशेज,दऱ्यादेवी मातोरी गायरान,रोहीला वनक्षेत्रासह,हरसूलघाट ही भक्ष्यस्थानी.

वन,पर्यावरण खात्याला,अजून गांभीर्य आहे कुठं?

नाशिक :- नाशिक जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे यंदा ही वनव्याचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.वनवा पर्यावरण,जैव विविधतेला जीवघेणा धोका असतानाही वनवा रोखण्यासाठीचे वन,पर्यावरण खात्याकडून वनसंरक्षण,वनवा प्रवण क्षेत्रात जाळपट्टे उभारणी,वनवा लागलेल्या ठिकाणचे नुकसानीचे ऑडिट,व वनवा लावणाऱ्यांचा शोध घेणे याकडे अजूनही गांभीर्याने बघितले जात नाही,दरम्यान यंदा तर नाशिक जिल्ह्यातील वनक्षेत्र मानवी दुष्टकृत्यामुळं वनव्याच्या कचाट्यात सापडले आहे. वाढत्या वनव्यात यंदा रामशेजला चारदा वनवा लागला, रोहीला घाटातील डाव्या बाजूचा वन डोंगर,घुमोडी वनक्षेत्र,खोरीपाडा वनक्षेत्र,वाघेरा-हरसूल घाटात वनव्याचा कहर कायमचा असल्याने नैसर्गिक संसाधणांचे, वन्यजीव, पक्षी विस्तापित होत आहेत,असंख्य दुर्मिळ झाडी, रोपे,नैसर्गिक बीज,एकूणच याठिकाणी असलेली जैवविविधता यात अतोनात नष्ट होत आहे,याबाबतीत व्यापक प्रयत्न हाती घेऊन वन पर्यावरण खात्याने पर्यावरण संस्था,वनसमित्या,एकत्रित करुण वनसंरक्षण,लाकूड तस्कराना रोखने,कुऱ्हाडबंदी,जाळपट्टे उभारणी,वनवा माफियाचा शोध, कठोर कायदेशीर कारवाई बाबतीत प्रयत्न करावे अशी मागणीच शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था,नाशिक, दरिमाता पर्यावरणमित्र,साहित्यिक पर्यावरण मित्र देवचंद महाले, व समविचारी पर्यावरण मित्र, विविध संस्था संस्थानी केली आहे,याबाबतीत निवेदनाद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या वन, पर्यावरण विभागास निवेदन ही दिले जाईल. वनवा निसर्गावर आलेले महाभयंकर संकट आहे, दुर्दैव हे कि याबाबत अजूनही शासन, प्रशासन,समाज,गंभीर नाही. उरले सुरलेल्या नैसर्गिक डोंगर,टेकड्या, घाटातील जैवविविधता वन्यजीव, पक्षी, दुर्मिळ झाडे कुऱ्हाडीच्या व वणव्याच्या हवाली असल्याचे चित्र थांबवन्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे जेष्ठ निसर्ग साहित्यिक देवचंद महाले यांनी व्यक्त केले, मातोरी गायरानातील वनवा थेट दऱ्या देवी पर्यावरण क्षेत्रापर्यंत धडकतो, आम्ही पर्यावरण मित्र, सहकारी शेतकरी, राह फाउंडेशनचे कार्यकर्ते,गवळवाडीचे गावकरी वनवा विझवन्यास येतात,मात्र हे सत्र थांबलं पाहिजे,दरवर्षी लागणाऱ्या वनव्यामूळ आम्ही लावलेली, जीवापाड जगवलेली भारतीय झाडे वाचवणार कशी? त्यासाठी वनवा लावतय कोण?शोधले पाहिजे, मात्र त्याबाबतीत उदाशिंनता आहे,वनवा थांबवण्यासाठी व्यापक जागृती व उपाय योजले का जात नाही? असा सवाल दरीमाता वृक्ष मित्र भारत पिंगळे, शिवाजी भाऊ धोंगडे, यांनी व्यक्त केला. दरम्यान काल दि १९ मार्च २०२४ रोजी सकाळी मी पेठ कडे शेतकरी संवाद बैठकीसाठी जात असताना वाघेरा-हरसूल घाटात वनवा लागलेला होता,काही स्थानिक लोक तो विझवत होते,मात्र दुपारी तीन वाजता परत ताना पुन्हा डोंगर देवाच्या दक्षिणेस घळीत वनव्यात डोंगर जळत होता नागरिकांना आवाहन केले मात्र कोणी थांबत नव्हते, केवळ पंकज धूम हा युवा सोबत घेऊन त्या अवघड घळीत वनवा विझवण्यात व्यस्त झालो, वृक्ष मित्र देवचंद महाले यांना फोन केला ते घुमूडी जंगलात वनवा विजवून घरी जात असतानाही थेट हरसूल घाटात आले आम्ही तिघांनी वनवा विझवण्यात भर उन्हात पश्चिम कडील वनवा विझवला, घसा कोरडा असतानाही हे काम केल,परतत असताना पुन्हा पूर्व घाटात वनवा वाढलेला दिसला वनविभागास खबर केली, हा वनव्याचा कहर थांबता थांबत नव्हता,रेंजर अधिकारी यांना फोन केल्यावर सायंकाळी वन विभागाचे कर्मचारी आले व त्यांनी वनवा रात्री आटोक्यात आणला,ते झटले, त्यांना ही मनुष्यबळ नाही अशी सगळी गत आहे,आज सह्याद्री व जंगलांना लागणारे वनवे झपाट्याने जैवविविधता नष्ट करत आहे. याचे गंभीर परिणाम मानवी जीवनावर व शेती व्यवसायावर पणं होत आहे.

दत्तू ढगे (पर्यावरण मित्र)

वनविभागाने सेवेमधील आक्रमकता वाढवावी, आग लावणा-यांचा कसोशीने शोध घ्यावा,कडक कायदेशीर कारवाईची पावले उचलली पाहिजे.जनजागृती केली पाहिजे. सोबत आग विझविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान साहित्य यांचा वापर करावा.घरात बसून एसी व पंख्याची हवा खाणा-या नागरिकांनी आता आग विझविण्यासाठी जास्तीत जास्त पुढं आलं पाहिजे. अन्यथा आपले व आपल्या भावी पिढीचे भवितव्य धोक्यात आहे .

शिवाजी धोंडगे (दरी माता पर्यावरण मित्र )

वनवा निसर्गाचा जीव घेतोय,दुर्दैव समाज, शासन, वन पर्यावरण विभागा ला जाग का येत नाही,वनवा लावणारे मोकाट का? किती जण धरले? वनवा लागतो नुकसानीची पाहणी त्याचे ऑडिट का होत नाही? जाळपट्टे उभारणी केली पाहिजे, त्याबाबतीत गांभीर्य का नाही? वनव्या मूळ बिबटे, मोर, माकडे, वन्यजीव मानवी वस्तीत आले, त्यांना त्यांची वस्ती जंगलात राहिली नाही,वनव्यात ते सैर वैर होतात मग पर्यावरण शिल्लक राहील कसे? हवामानाचा समतोल ढळेल मग डोळे उघडणार का? असे कित्येक प्रश्न पुढे येतात

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *