google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

सुयोग हॉस्पिटल, दिंडोरी रोड येथील डॉ. कैलास राठी यांचेवर हल्ला करणार आरोपी २४ तासाचे आत पंचवटी पोलीसांनी घेतले ताब्यात

author
0 minutes, 1 second Read

नाशिक :- दिनांक २३/०२/२०२४ रोजी रात्री ०९:२० वाजेच्या सुमारास सुयोग हॉस्पिटल, नाशिक येथील मिटींग रूम मध्ये डॉ. कैलास जगदीश राठी, वय ४८ वर्षे यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने इसम नामे राजेंद्र चंद्रकांत मोरे याने आर्थिक देवाण-घेवाणच्या वादातुन कोयत्याने डोक्यावर, गळ्यावर वार करून गंभीर जखमी करून पळुन गेला होता. सदर संशयिता विरूध्द डॉ. रिना कैलास राठी यांचे तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे । गुन्हा. रजि. नं. १०९/२०२४भा.दं.वि. कलम ३०७,३४ सह आर्म अॅक्ट ४/२५, मुपोकाक. १३५ अन्वये नोंद करण्यात आला आहे. सदर संवेदनशील गुन्हयाचे अनुषंगाने मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२, श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी सदर गुन्हयातील संशयित आरोपीताचा शोध घेवुन तात्काळ अटक करणेबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे जखमी डॉ. कैलास राठी यांची अपोलो हॉस्पिटल, नाशिक येथे भेट घेवुन, त्यांची पत्नी डॉ. राठी व वैद्यकियअधिकारी, अपोली हॉस्पिटल, नाशिक यांचेशी प्रकृती बाबत विचारपुस केली. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयातील संशयित आरोपीतांचा शोध घेण्याकरीता पंचवटी पोलीस स्टेशन कडील पथके रवाना करण्यात आली होती. संशयित आरोपी राजेंद्र चंद्रकांत मोरे, वय ३७ वर्षे हा जुना आडगांव नाका, संतोष टि पॉईट परिसरात त्याचे भावास भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोहवा /१५२८ शेखर फारताळे यांना प्राप्त झाल्याने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शना खाली सदर परिसरात सपोनि. विलास पडोळकर, पोहवा /१५२८ शेखर फारताळे, पोहवा /१३४७ संतोष जाधव, पोहवा / ४८० राजेश सोळसे, पोना / १७२० यतीन पवार, पोअं. /१९२७ श्रीकांत कर्पे, पोअं/२२७१ युवराज गायकवाड या पोलीस पथकाने सापळा रचुन संशयित आरोपीतास ताब्यात घेवुन पुढीलतपासकामी पंचवटी पोलीस ठाणे येथे आणुन सदर गुन्हयात अटक केली आहे. सदरची उल्लेखनिय कामगिरी ही श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, श्री. नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, वपोनि. मधुकर कड, पोनि (गुन्हे). श्री. नंदन बगाडे, पंचवटी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील सपोनि. विलास पडोळकर, सपोनि. मिथुन परदेशी, सपोउनि. अशोक काकड, पोहवा /१५२८ शेखर फारताळे, पोहवा /१२०६ सागर कुलकर्णी, पोहवा/१३४७ संतोष जाधव, पोहवा / ४८० राजेश सोळसे, पोना/१७२० यतीन पवार, पोअं./१९२७ श्रीकांत कर्पे, पोअं/२२७१ युवराज गायकवाड, व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अशांनी पार पाडली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि. विलास पडोळकर हे करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *