google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी भविष्य निधी ऑफिसमध्ये चक्क आयुक्तांनीच केले नियमांचे उल्लंघन

author
0 minutes, 0 seconds Read

शिपायांजवळ मोबाईल जमा करा नंतर मला भेटा

नाशिक जिल्हा पीएफ ऑफिसमध्ये , आयुक्तांचा गजब कारभार

नाशिक :- नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी भविष्य निधी ऑफिसमध्ये चक्क आयुक्तांनीच केले नियमांचे उल्लंघन
पत्रकारांना भेटण्यास नकार , बाहेर मोबाईल जमा करा नंतर मला भेटा, काय काम आहे ते शिपाईला सांगा तरच आत प्रवेश
दिनांक २१/०२/२०२४ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आपला महाराष्ट्र न्यूज चे उपसंपादक स्वप्निल गोवर्धने तसेच आरटीआय कार्यकर्ते शाम खांडबहाले यांना नाशिक जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या असलेला तक्रार अर्ज देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं
तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक आस्थापना कायद्याची पायमल्ली करत कामगारांचा पगार हा नियमबाह्य करत आहेत असे सर्वेक्षणास दिसत आहे. कामगारांना शासन वेतनश्रेणी प्रमाणे पगार मिळावा तसेच त्यांचा पीएफ पीएसआयसी वेळोवेळी भरला जावा त्यांना शासकीय सेवा योजनांचा लाभ मिळावा या चर्चेसाठी श्याम खांडबाले व स्वप्निल गोवर्धने आयुक्तांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी यासंदर्भात कामगार आयुक्तांना देखील पत्र दिले.
के.के. कुंभार पीएफ आयुक्त यांनी प्रवेश नाकारल्यावर 112 नंबर वर कॉल करून पोलीस मदत मागवण्यात आली तसेच सातपूर पोलीस स्टेशन येथे के.के कुंभार आयुक्त साहेब यांच्यावर शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी अर्जाद्वारे करण्यात आली. आयुक्तांनी मोबाईल जमा करणे हा कायदा शासन परिपत्रक कोठून आणले असे असेल तर त्यासंबंधी खुलासा करावा
अन्यथा सातपूर पोलीस स्टेशन ने त्यांच्यावर जनसामान्यांना दिशाभुल केले कामी तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा. अशी विनंती सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना करण्यात आली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *