नाशिक जिल्ह्यातील हजारो मराठा समाज बांधव गनिमी कावा करणार ? प्रशासन मात्र झोपेतच …

author
0 minutes, 0 seconds Read

दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता उर्वरित मराठा समाज बांधव नाशिक मधील शिवतीर्थ येथून सर्व रसद घेऊन पुण्याकडे रवाना होणार असल्याची माहिती.

नाशिक :- सकल मराठा क्रांती मोर्चा नाशिकचे जिल्ह्यामधून हजारो समाज बांधव गनिमी काव्याने हे मुंबईमध्ये विविध ठिकाणी बैठकी मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करत रवाना झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा हिंदवी स्वराज्य उभारणीसाठी वापरला होता अगदी त्याच पद्धतीने गनिमी कावा वापरात सकल मराठा समाज नाशिक चे अनेक समाज बांधव मुंबई येथील मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहे.
या आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यामधील सर्व गावांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने ग्रुप तयार करून ते ग्रुप मुंबईला आंदोलनात सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक सकल मराठा समाजाने नियोजन केले होते.
आणि हे नियोजन 70 टक्के यशस्वी झाल्याचे बैठकीत सर्वांनी सांगितले.
मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेत नाशिक मधील मराठा समाज बांधव हे आंदोलनासाठी मुंबईकडे न जाता पुण्याकडे जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. हा या आंदोलनाचा एक गनिमी कावा होता पुण्याकडे समाज बांधव जाणार हे दाखवून उलट मुंबईमध्ये मराठा समाज बांधव पाठविण्याचे नियोजन नाशिक मधील सर्व सकल मराठा समाज बांधवांनी ठरविले होते त्या पद्धतीने नियोजन करून आज त्या संदर्भातली अंतिम आढावा बैठक नाशिक शिवतीर्थ या ठिकाणी संपन्न झाली.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,नाशिक जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांना करण्यात आलेल्या आव्हाना प्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आंदोलनासाठी रसद म्हणून तांदूळ,तेल, दाळ,शेंगदाणे आदी अन्न साहित्य मोठ्या प्रमाणात जमा केले आहे.
औदुंबर लॉन्स या ठिकाणी जिल्ह्यातील विविध भागातून जमा केलेली अन्नधान्याची रसद एकत्रितरित्या गाड्यांमध्ये भरून दिनांक 24 रोजी सकाळी शिवतीर्थ सि बी एस येथून पुण्याकडे रवाना होतील.
त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे तसेच प्रत्येक तालुका निहाय हजारोंच्या संख्येने समाज बांधव २४ रोजी शिवतीर्थ या ठिकाणी येणार आहे. मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी पुकारलेला हा मराठा समाजाचा अंतिम लढा संपुर्ण ताकतीने लढण्यासाठी नाशिककर सज्ज झाले असून मराठा समाजाला 50% च्या आत आणि ओबीसीतून आरक्षण मिळावे तसेच सरसकट कुणबीचे दाखले मिळावे यासाठी या लढ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे.
त्याच बरोबर विविध तालुक्यातील मराठा बांधव हे गटागटाने या आधीच मुंबईतही हजाररोंच्या संख्येने दाखल झाले आहे व त्यांचे तेथील असलेले नियोजन पूर्ण झाले आहे.

मराठा समाजाचे नेते चंद्रकांत बनकर,शिवाजी सहाणे यांनीही समाज बांधवांना आवाहन केले आहे की नाशिक जिल्ह्यातून मुंबई आंदोलनात सहभागी होणाऱ्या समाज बांधवांनी ठरवून दिलेल्या मार्गानेच मार्गक्रमण करावे या दरम्यान घालून दिलेल्या आचारसंहितचे सर्वांनी पालन करावे.
जाताना कोणी वाहने वेगाने चालवणार नाही याची खबरदारी घ्यावी. दुचाकी वर असणाऱ्या सर्व बांधवांनी हेल्मेट वापरावे. त्याचबरोबर आपापल्या गाड्यांचे सर्व कागदपत्र देखील सोबत ठेवायचे आहेत.

मराठा उपोषणकर्ते नानासाहेब बच्छाव यावेळी म्हणाले की नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व तालुका निहाय बैठका संपन्न झाल्या असून जे सर्व तयारी ही पूर्ण झालेली आहे.
आज संध्याकाळी औदुंबर लॉन्स या ठिकाणी जमा झालेली अन्नधान्याची रसद ही आंदोलन स्थळी उद्या रवाना होणार असून आंदोलन पुढे कितीही दिवस चालले तरी नाशिक जिल्ह्यातील आणखी रसद ही जमा करण्याचे काम चालू आहे.
प्रत्येक घरातील एक समाज बांधव या लढ्यामध्ये सहभागी होणार असल्याने निश्चित मुंबई येथील आंदोलनात नाशिक जिल्ह्याची संख्या ही लक्षणीय असणार याबाबत शंका नसून मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनांचे ततोतंत पालन करत नाशिक जिल्हा या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे

या बैठकीस करण गायकर,चंद्रकांत बनकर,शिवाजी सहाणे,नानासाहेब बच्छाव,विलास पांगरकर,योगेश नाटकर,संजय फडोळ, नितीन रोटे पाटील,बंटी भागवत,डॉ.सचिन देवरे,प्रशांत पुरकर,किशोर जाचक, कैलास खांडबहाले, स्वप्ना राऊत,हिरामण वाघ,संगीता सूर्यवंशी,सविता वाघ रोहिणी उखाडे,ममता शिंदे, एकता खैरे,अनिता भामरे,प्रकाश बनकर,प्रफुल वाघ,संदीप खुठे, सचिन पवार, निलेश मोरे, राम निकम,अजित नाले,नितीन काळे, संदीप बरे,विक्रम गायधनी,नितीन काळे,सचिन पवार,राजेंद्र शेळके, वैभव दळवी, उमेश शिंदे,मंदार बर्वे,हार्दिक निगळ,विकी गायधनी विकी ढोली, शरद लबडे,संदीप लबडे, गोरख गवळी,राजू भालेराव,अनिल गायकवाड,नितीन पिंगळे,भास्कर पिंगळे,सागर कातड,शंकर वाघमारे,सचिन जाधव,ज्ञानेश्वर कवडे,ज्ञानेश्वर सुराशे,निलेश ठुबे,सागर वाबळे,सुभाष भोसले प्रशांत सूर्यवंशी,कल्पेश पाटील आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *