google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मराठा आंदोलनात नाशिकची निर्णायक भूमिका ?

author
0 minutes, 2 seconds Read

नाशिकच्या साखळी उपोषणकर्ते समर्पित,
समाज विसरणार नाही,

मंगळवारी शिवतीर्थावर 105 व्या दिवसी आंदोलनाची सांगता,

नाशिक :- सकल मराठा समाजाची बैठक (दिनांक २३ रोजी)नाशिकच्या शिवतीर्थावर झाली.या बैठकीत
मराठा क्रांतीयोद्धा मनोज जरांगे पाटील देतील त्या इशाऱ्यावर आम्ही नाशिकचा भव्य सहभाग मुंबईच्या निर्णायक आंदोलनात नोंदवेल,मुंबईपासून नाशिक जवळ असल्याने नाशिक मोठ्या संख्येने सहभागी होईल.तसेच नाशिकच्या साखळी उपोषणात मुख्य उपोषणकर्ते नाना बच्छाव यांच्या नेतृत्वात सहभागी प्रत्येक समर्पित उपोषणकर्ते यांचे ऋण मराठे विसरणार नाही.यापुढे आता नाशिकची भूमिका पुढील आंदोलनात अधिक जोमाने बजावणे,उपोषण कर्त्यांच्या आभाराचा ठराव करणे,पुढे सकल मराठा समाज संघटन ठेवणे,तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे पुढील निर्णायक आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवणे,यासंदर्भात चर्चा करण्याचें आवाहन करताना मराठा समाजाचे साखळी उपोषणात सहभागी उपोषणकर्ते व सहभागी उपोषणकर्त यांचा त्याग अपार आहे,असे त्यांनी सांगितले.
नाशिकच्या शिवतीर्थावर उपोषणस्थळी सकल मराठा समाजाची बैठक झाली,सुरुवातीला प्रास्ताविक करताना उपोषणकर्ते राम खूर्दळ यांनी मराठा साखळी आंदोलनातील अखंडित सहभागी उपोषणकर्ते यांचे आभार,मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्यास पुढील मराठा आंदोलनात सहभाग वाढवणे,उपोषणाची सांगता करणे,याबाबत ठराव करावं असे आवाहन केले.
यावेळी मराठा समाजाचे करण गायकर यांनी जिल्हाभर मराठ्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात जोडण्यासाठी जनजागृती करणे,यासाठी गाव निहाय बैठका घेणे याबद्दल मुद्दे मांडले, शेतकरी वर्गाचे ट्रॅक्टर रोखणारे सरकार कोण?हा सवाल ही केला.त्यानंतर डॉ नाठे यांनी छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात दिल्लीतील खासदार बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली,ad स्वप्ना राऊत यांनी मराठा आंदोलनात नाशिकच्या वकिलांची कायदेशीर सहभाग असेल,तसेच महिलांची ताकत नाटकी सरकारला आम्ही पुढील आंदोलनात दाखवून देवू असे सांगितले,मराठा समाजाचे सुनील बागुल यांनी उपोषणात सहभागी यांचा त्याग समाज विसरणार नाही,आरक्षणाच्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत,राहणार,ad कैलास खांड बहाले यांनी कायदेशीर माहिती दिली,अखेरीस नाना बच्छाव यांनी बोलताना नाशिकच्या उपोषणात असंख्य समाज बांधव जोडले,मुस्लिम,वडार,मेहत्तर,आदिवासी,ओबीसी,दलीत समाज वारकरी,v राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला.या आंदोलनात सामाजिक सलोखा बांधला गेला.आम्ही उपोषणात सामाजिक जिव्हाळा मिळवला सामाजिक सेवा यातून घडली असे त्यांनी सांगितले.v शेवटी मराठा समाजाचे दिवंगत वैशालीताई शेलार,v दिवंगत सुभाष कळमकर, याना भावपूर्ण श्रद्धांजली समाजावतीने वाहण्यात आली.
तत्पूर्वी यासाठी जिल्हावार जनजागृती केली जाणार आहे.दरम्यान येत्या मंगळवारी १०५ व्या दिवशी नाशिकचे साखळी उपोषण सांगता केली जाईल.
यावेळी बैठकीत नाना बच्छाव,चंद्रकांत बनकर,राम खूर्दळ,सुनील बागुल,करण गायकर, उद्धव निमसे,नितीन रोटे पाटील,निलेश ठूबे,कैलास खांडबहाले,विकी गायधनी,डॉ वसंत ढिकले,सागर वाबळे,योगेश नाटकर पाटील,ज्ञानेश्वर सुरासे,श्रीराम निकम,गोकुळ पिंगळे,सुधीर पौल,स्वराजचे रुपेश नाठे,संजय फडोळ,हभप कृष्णा धोंडगे,भारत पिंगळे,ममता पाटील,ad स्वप्ना राऊत,स्वाती कदम,चारुशीला भंडारे,राजेंद्र शेळके,मंगेश गोडसे,हिरामण नाना वाघ,अनिल अहेर,अरुण निकम,सुधाकर चांदवडे,अरुण निकम,गणेश पाटील,महेंद्र बेहेरे,रमेश खापरे,सतीश नालकर,राम निकम,रोहिणी उखाडे,नितीन काळे,आश्विन बडगुजर,वंदना पाटील,विजय चुभले,नीरज चौधरी,अजय कश्यप,ममता शिंदे,राजू भालेराव,निर्मला भाटीवार,सुमन महाले,सुनील निरगुडे,गणेश खांदवे,रमेश पवार,पूजा धुमाळ, सुवर्णा जैतमल,भास्कर जाधव,शंकर वाघमारे,बाळासाहेब घडवजे,शशी मातेरे,मंगेश गोडसे,सागर कातडं पाटील,सुनीता पाटील,अंकिता मोरे,यासह मोठ्या संख्येने समाजातील घटक उपस्थित होते,

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *