google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

पुणे ड्रग्जचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेची कारवाई

author
0 minutes, 0 seconds Read

सांस्कृतिक राजधानी पुण्यात वारंवार अंमलीपदार्थांचा उघड सेवन विक्री आणि सेवन वाढत चालल्याचे उघडकीस आले आहे. नुकताच पुण्यातील एफसी रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये अल्पवयीन मुलांना उघडपणे ड्रग्ज पुरविले जात असल्याचा व्हिडीओ कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्हायरल केला होता. त्यानंतर कालच आणखी ड्रग्ज पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्येचे माहेरघर पुणे उडता पंजाब झाल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश कालच दिले होते. त्यानंतर पुणे महानगर पालिकेच्या तोडक पथकाने मंगळवारी फर्ग्युसन रोडवरील बारवर जोरदार तोडकाम कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमुळे आता राज्य सरकारही उत्तर प्रदेशातील योगी आदित्य यांचा बुलडोझर कित्ता गिरविते की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

पुण्यात सर्वात आधी ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर अंमलीपदार्थ्यांच्या खुलेआम व्यापार सुरु असून पोलिसच यात गुंतलेले असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणी राज्य सरकारने अनेक पोलिसांवर कारवाई केली होते. या प्रकरणात ललित पाटील याला व्हीआयपी ट्रीटमेंट आणि पळून जाण्यास मदत झाल्याप्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना निलंबित केले गेले. हे प्रकरण शांत होत न होत तोच आता पुण्याचे नामांकित बिल्डल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने नंबरप्लेट नसलेल्या आलीशान पोर्शे कारने बाईकवरुन निघालेल्या तरुण-तरुणींना उडविल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात संबंधित अल्पवयीन तरुणाला वाचविण्यासाठी अनेक राजकारणी आणि पोलिस तसेच संबंधित रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कशी अभद्र युती झाल्याने सगळ्या जगाने पाहीले. आता पुण्यातील एफसी रोडवरील एल-3 बारमध्ये एका अल्पवयीन तरुणाला खुलेआम ड्रग्स सर्व्ह केली जात असल्याचे उघडकीस आले होते. तसेच पहाटेपर्यंत पब आणि बार सुरु असल्याचे व्हिडीओत दिसत होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *