google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान; निवडणूक रिंगणात २१ उमेदवार

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उद्या बुधवारी (दि. २६) मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक लढविणाऱ्या २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे. प्रत्येक शिक्षक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा अर्थात मतदानाचा दिवस उद्यावर आला आहे. विभागातील नाशिकसह जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार येथील शिक्षकांना निवडणुकीच्या माध्यमातून मतदानाची संधी प्राप्त झाली आहे. विभागात ९० केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ६९ हजार ३९८ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यामध्ये ४६ हजार ५०३ पुरुष आणि २२ हजार ८६५ महिला शिक्षक मतदार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतदान मतपत्रिकेद्वारे केले जाणार आहे. मत बाद होणार नाही याची काळजी मतदारांनी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अंध व्यक्तीला किंवा हाताने मतदान नोंदविण्यास असमर्थ असलेल्या दिव्यांग व्यक्तीला मदतनीस किंवा साथीदार उपलब्धतेस परवानगी असणार आहे.

किशोर दराडे, अॅड. संदीप गुळवे, अॅड. महेंद्र भावसार, भागवत गायकवाड, अनिल तेजा, अमृतराव उर्फ आप्पासाहेब शिंदे, इरफान इसहाक, भाऊसाहेब कचरे, विवेक कोल्हे, सागर कोल्हे, संदीप कोल्हे, गजानन गव्हारे, संदीप गुरूळे, सचिन झगडे, दिलीप डोंगरे, आर. डी. निकम, पै. डॉ. छगन पानसरे, रणजित बोठे, महेश शिरूडे, रतन चावला, संदीप गुळवे (पाटील).

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *