google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिक शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदेंची एन्ट्री, आता निवडणूक झाली प्रतिष्ठेची

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक: लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच, राज्यात शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने वातावरण तापवले आहे. त्यातही उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते माघारी या कालावधीतील घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे नाशिक शिक्षक मतदारसंघ प्रचंड चर्चेत आहे. याचदरम्यान आता नाशिक शिक्षक मातदारसंघासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत.

महायुती (शिवसेना शिंदे गट ) उमेदवार किशोर दराडे (Kishore Darade) यांच्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार नाशिक,शिर्डी आणि जळगावमध्ये बैठक घेणार आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडून देखील महेंद्र भावसार मैदानात उतरले आहेत. महेंद्र भावसार यांच्या उमेदवारीने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे महेंद्र भावसार यांच्या उमेदवारीबाबतीत मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या एन्ट्रीने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

शिक शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत

वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर, बुधवारी दुपारी भाजपचे विखे व काँग्रेसचे पाटील यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातील 36 पैकी 15 उमेदवारांनी माघार घेतली. आता 21 उमेदवार रिंगणात राहिलेत. पण खरी लढत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे अॅड. संदीप गुळवे व अपक्ष मैदानात उतरलेले कोपरगाचे नितीन कोल्हे यांच्यात तिरंगी होणार आहे.

वरिष्ठ नेत्यांनी चक्रे फिरवली अन् बंड थंड

महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजुंच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला शेवटच्या टप्प्यात सुटली. त्या अगोदर भाजप नेते राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ.राजेंद्र विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली. मविप्रचे संचालक अॅड. संदीप गुळवे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला असताना काँग्रेसचे पाटील यांनीदेखील अर्ज दाखल केला. त्यामुळे दोन्हीकडे बंडखोरी पाहायला मिळाली. परंतु अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मुंबईत वरिष्ठ नेत्यांनी चक्रे फिरवली आणि बंड थंड झाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *