google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

म्हणून 21 जूनलाच आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो, हे आहे खरं कारण

author
0 minutes, 2 seconds Read

आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या ६९ महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्राच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेनं प्रस्ताव मंजूर केला. पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ २१ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला. २१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. याला उन्हाळी संक्रांतीदेखील म्हणतात. यामुळे या दिवसाची निवड करण्यात आली

यंदा ‘मध्यवर्ती कल्पना’ (थीम) काय आहे?

दरवर्षी एक विशेष थीम लक्षात घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यंदा म्हणजे २०२४ या वर्षासाठी ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी थीम ठेवण्यात आली आहे. यंदा या मध्यवर्ती कल्पनेसह महिलांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. महिलांचे कल्याण सर्वांगीण वाढवण्यात आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. हे अधोरेखित करण्यासाठी ही थीम निवडण्यात आली आहे. हा दिवस महिलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासातील प्रगती साजरी करेल, असा विश्वास ही थीम निवडताना व्यक्त करण्यात आला. 

.
दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर योग दिवस साजरा केला जातो. यंदाची योग थीम ही महिलांवर आधारित आहे. ‘महिला सशक्तिकरणासाठी योग’ ही आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४ ची थीम आहे. ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ची थीम काहीतरी वेगळा संदेश देणारी असते. यंदा महिलांना केंद्रस्थानी ठेवून ही थीम ठेवण्यात आलीय.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *