google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

author
0 minutes, 0 seconds Read

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच काही जिल्ह्यांतील धरणांच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. यामुळे पाणी टंचाईपासून त्या जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे.

यांनतर आता पुन्हा एकदा पुढील तीन दिवस राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बारसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तर या आठवड्यात मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर या काळात महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किमी राहील असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज आणि पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *